Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रकल्पाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक इशारा

जळगाव

डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रकल्पाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक इशारा

Editorial DeskBy Editorial DeskNovember 13, 2026Updated:November 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाची उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसह प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. काम विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास डम्पिंग ग्राउंडवर शहराचा कचरा टाकू देणार नाही, असा कडक इशाराही दोन्ही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, मनपा आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, प्रकल्प प्रमुख अभियंता योगेश वाणी, तसेच ‘रॉयल वेस्टर्न’चे राऊत आणि ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर’चे साईट इंजिनीयर उपस्थित होते. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्या तुलनेत आता कामात चांगली गती दिसून येत आहे. सद्यस्थितीत रॅम्पचे काम सुमारे ८० टक्के, तर प्रोसेसिंग प्लांटचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. रॅम्पचे उर्वरित काम महिनाभरात पूर्ण होईल, तसेच काँक्रिटींग बेस व पिलरचे काम होताच पुढील ३ ते ४ महिन्यांत फॅब्रिकेशनचे काम पूर्ण केले जाईल, असे ठेकेदाराने सांगितले. हे काम मुदतीत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र प्रशासनाला देण्याच्या सूचना ‘रॉयल वेस्टर्न’च्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.

दरम्यान, डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे पसरणाऱ्या धुराचा परिसराला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुरामुळे नागरिकांना दिवाळीचा सणही नीट साजरा करता आला नाही, तसेच परिसरात दमा, त्वचाविकार आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी आक्रमक भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावर तातडीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राउंडवर २४ तास अग्निशमन दलाचा बंब तैनात ठेवण्यात यावा, जेणेकरून आग आणि धुरावर नियंत्रण मिळवता येईल, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांना देण्यात आल्या.

“जळगाव शहराचा संपूर्ण कचरा आमच्या प्रभागात आणला जातो. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. काम रखडल्यास आम्ही कचरा गाड्या रोखून धरू,” अशा शब्दांत मनोज चौधरी आणि डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाला आणि ठेकेदाराला धारेवर धरले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

November 14, 2026

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add