Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»आसोदा-भोलाणे रस्त्यावरील खड्ड्यात तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय व्यक्त!

क्राईम

आसोदा-भोलाणे रस्त्यावरील खड्ड्यात तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय व्यक्त!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 13, 2026Updated:November 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आसोदा ते भोलाणे रस्त्यावर शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यात ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह दुचाकीसह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गलू देवीदास कोळी (रा. भोलाणे, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गलू कोळी हे १० नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी रात्री १० वाजेपर्यंत त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता.

दरम्यान, शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आसोदा-भोलाणे रस्त्यावरील शेताकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह गलू कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, गलू कोळी यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तीन ते चार जणांनी मिळून भावाचा घात केला असावा, असा गंभीर आरोप त्यांचे भाऊ मनोज कोळी यांनी केला आहे. त्यामुळे या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपासातून मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पोलिसांसमोर मांडली पीडिताची बाजू!

November 14, 2026

राष्ट्रवादी विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील; आमदार अनिल पाटलांचे स्पष्ट विधान!

November 14, 2026

भुसावळ-वरणगाव परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला! नागरिकांची घराबाहेर धाव

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add