Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पुरुषार्थ असेल तरच गुरुंची कृपा प्राप्त होते असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

ताज्या बातम्या

पुरुषार्थ असेल तरच गुरुंची कृपा प्राप्त होते असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

संतांनी सांगितलेले सूत्र आत्मसात केले तरच गुरुंची कृपा‌ही आपोआप होत असते.

जामनेर : पुरुषार्थ असेल तरच गुरुंची कृपा प्राप्त होते असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. चैतन्य धाम जामनेर येथील राधामाधव मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते.

जीवन क्षणभगूर आहे ते पुरुषार्थ करून, सन्मार्गाने जगता आले पाहिजे. जिनकी मृत्यू होती हैं उनकी कोई प्रॉपर्टी नहीं गाडीचा विमा असला तरच नवीन गाडी मिळेल, पण शरीर एकदा गेलं तर पुन्हा नाही मिळत म्हणूनच भगवंत प्रेमात लिन व्हा, निर्व्यसनी रहा आणि सर्वांना सहकार्य करा. योग्यता असेल तर गुरूंची कृपा ही आपोआप होते. जसे श्याम चैतन्यजी यांच्यावर असलेला गुरूंचा आशीर्वाद त्यामुळे चैतन्य धाम एक सुंदर असं पवित्र देवस्थान म्हणून तालुक्यामध्ये नावारूपाला येत आहे.

संतांनी सांगितलेले सूत्र आत्मसात केले तरच गुरुंची कृपा‌ही आपोआप होत असते. पात्रता असेल तरच गुरूंचा आशीर्वाद हा मिळतच असतो. वडिलांची कठोरता मुलांच्या कल्याणासाठी असते. संतांचे रागावणे भक्ताच्या कल्यानासाठी, शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांच्या कल्याणसाठी असते. मनुष्य जन्म देवाने दिलाय तर त्याचे चिंतन करणे म्हणजे महत्वाचे. या मनुष्य देहाची मूल्य समजून घेतले पाहिजे. त्याला जपली पाहिजे व नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे. असे आपल्या तेजस्वी वाणीतून स्वामीजींनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला बालयोगी गेंदालालजी महाराज, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी सभापती नवलसिंग पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, श्रीराम महाजन, बाबुराव हिवराळे, प्रल्हाद सोनवणे, सुभाष पवार व तालुकाभरातून भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उंच. अशा स्तंभावर केशरी रंगाच्या ध्वजाचे संतांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना गुरुदेव सेवा आश्रमचे अध्यक्ष परमपूज्य शाम चैतन्य जी महाराज यांनी या सुंदर मंदिराची उभारणी गुरुकृपेमुळे व भक्तांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. या ठिकाणी एक छोटीशी कुटी होती आज त्या कुटीचे रूपांतर सुंदर अशा देवालयात झाले आहे. ही केवळ आणि केवळ गुरुची कृपा असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक निलेश चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी कुमारी वैष्णवी सुषिर हिने अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज व श्याम चैतन्य जी महाराज यांच्या वर उपस्थित भक्तांनी पुष्पवर्षाव केला. कार्यक्रमाचे आभार गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे सचिव रवींद्र महाजन यांनी केले. यावेळी भाग्योदय परिवार, विजू पाटील दीपक चव्हाण सुधाकर पवार दिलीप चव्हाण गोकुळ महाराज राजनकर परिवार, विठ्ठल जाधव, धाडी वसंत पवार, चतरु नाईक, सुनील पवार, बद्रि राठोड, तसेच सर्व परिसरातून मोठ्या प्रमाणात बंधू-भगिनी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add