Author: Nilesh Ajmera

वाहतूक कोंडीतून जळगावकरांना दिलासा मिळण्याची आशा तरसोद ते पाळधी बायपासमुळे जळगाव शहरातील अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी दिसून येते. यामुळे शहरातूनच जाणारी अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशातच शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रस्तावाला तातडीने मंजुरी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रिंग रोड उभारल्यास शहरातील वाहतूक…

Read More

राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला राज्यात सध्या महानगरापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.त रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. काँग्रेस पक्षाने देखील जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. यादीमध्ये यांच्या नावाचा समावेश? काँग्रेसच्या महापालिका…

Read More

अक्षरलेखन सुंदर अक्षर कृती सत्राचे आयोजन जळगांव शहरातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात २० डिसेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे 7 7 7 प्रोजेक्ट अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अक्षरलेखन व सुंदर हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी अक्षरलेखन कृती सत्राचे आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील मुख्याध्यापक दिवाकर जोशी होते तर प्रमुख अतिथी रोटरी क्लबचे समन्वयक सुबोध सराफ हे होते. याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व रोटली क्लबचे समन्वयक सुबोधजी सराफ यांनी विद्यार्थ्यांना कॅलिग्राफी अक्षरलेखन कसं करावं व सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याविषयी कृती सत्र घेतले व…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आगारातून ५० प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात होता होता वाचला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात घसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे. सोमवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बस क्रमांक (MH 14 BT 2611) पाचोरा स्थानकातून निघाली होती. मोंढाळे ते निंभोरी गावांच्या दरम्यान, माजी सरपंच मीनाक्षी दिवटे यांच्या शेताजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला जोरात कट मारला. रस्ता अरुंद असल्याने आणि पाचोरा ते सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू…

Read More

दक्षा फाउंडेशन आयोजीत स्वयंरोजगार मेळाव्यात नव्वद महिला व तरूणांनी घेतला लाभ जळगाव : दक्षा फाउंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्यामार्फत दिनांक 21 डिसेंबर रोजी महिलांसाठी व तरुणांसाठी महा रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जळगाव शहराचे लाडके आमदार राजुमामा भोळे, जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योगाचे विसपुते, वाडेकर, दिनेश पाटील, कन्सल्टंट समाधान पाटील तसेच दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी सपकाळे, आशिष सपकाळे आदी उपस्थित होते. स्वयंरोजगार मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना आमदार राजुमामा भोळे म्हणाले की पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरू नका, ते तुम्हाला फक्त मागे फिरवतील तुमचे काम करणार नाही. स्वतःच्या पायावर उभे रहा छोटामोठा रोजगार निर्माण करा, आई वडीलांना आदर्श माना आणि…

Read More

जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज… गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात अचानक घसरण झाली असून पार ९ अंशावर आला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या सप्ताहात जिल्हा परिसरात थंडीच्या लाटेने आपला प्रभाव दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. जिल्ह्यात दिवसा २७ ते २९ अंशादरम्यान उन तर सायंकाळनंतर रात्रीचे कमाल तापमान तापमान १९ अंशांवरून थेट ९ ते ६ अंशावर ३१ अंशांवर गेले होते, त्यामुळे थंडीचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसापूर्वी जळगाव शहरात तापमानाचा पारा किमान १४ अंशावर होता. त्यात पुन्हा घसरण होवून तापमान ९…

Read More

इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांचे मिशन महापालिका सुरू झाले आहे. अर्थात आज दि. २३ डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवसेना यांनी स्वबळाचा नारा देत, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र यावरून चर्चेचे गुन्हाळ सुरूच असून, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारी अर्ज ऑफलाइन की ऑनलाईन? महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची मागणी विविध पक्षांनी केली होती. विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करण्याची परवानगी देण्यात…

Read More

नशिराबादच्या आजीबाईंचा ऐतिहासिक विजय, जळगाव : नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली; परंतु याहूनही अधिक चर्चा वयाच्या ७७ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांची होत आहे. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्त आयुष्याचा विचार करतात, त्या वयात जनाबाई रंधे यांनी नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे. नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ‘अ’ मधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जनाबाई रंधे यांनी कडक उन्हात, पायात चप्पलही उ घालता प्रचार केला. ना हातात काठी, ना शरीराची तक्रार. खरं तर तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून मतदार प्रभावित झाले. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि विकासाची ग्वाही…

Read More

धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक गडबडले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिल्लीकडून येणाऱ्या बहुतांश गाड्या सोमवारी (दि. २२) २ ते १३ तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होता आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्याचा वेग मंदावला आहे. दिल्ली, पंजाब पंजाब आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याने रेल्वेच्या वेगावर मर्यादा आल्या आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लोको पायलटला गाड्या संथ गतीने चालवाव्या लागता आहे. त्यामुळे…

Read More

29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची खऱ्या अर्थाने धावपळ सुरु होणार असून राजकीय वातावरण तापले आहे. जळगावसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे आज 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक…

Read More