चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व त्याच्या बाजूला बसलेला प्रवासी थोडक्यात बचावला. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जीएमसीत दाखल करण्यात आले आहे.तर मालवाहू वाहन रस्त्यावरील दुभाजकावर चढले. या घटनेबाबत असे की, भुसावळकडून जळगावकडे मारुती बलेनो चारचाकी (क्रमांक एमएच-१९, सीव्ही ६३८७) येत होती. तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन जळगावकडून अमरावतीकडे खजूर घेऊन जात होते. चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात…
Author: Nilesh Ajmera
मुक्ताईनगरमध्ये कोथळी गावाजवळ घडली घटना मुक्ताईनगर प्रतिनिधी : एसटी बस थांबवली नाही या क्षुल्लक कारणावरून मुक्ताईनगर आगाराच्या बस चालकाला अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, गुंडगिरी करत आरोपींनी चालकाला पाय धरून आणि नाक घासून माफी मागण्यास भाग पाडले. या धक्कादायक घटनेमुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फिर्यादी जीवन सुभाष सुरवाडे (वय ३५, रा. कुन्हा, ता. भुसावळ) हे मुक्ताईनगर आगारात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी ते फैजपूर ते मुक्ताईनगर या मार्गावर प्रवाशांना घेऊन बस (सावदा-उदळी-चिंचोली-चांगदेव मार्गे) जात होते. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वढवे फाटा ते हरताळा फाटा दरम्यान आरोपींनी बसला…
मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या विजयी जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर नगर परिषदेचा निकाल अखेर हाती आला आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला असून, नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील यांचा 2561 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह सासरे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर नगर परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, मुक्ताईनगरच्या जनतेने खरी गुंडागिरी ही मतदानाच्या माध्यमातून नष्ट केली आहे. आमदार एकनाथ…
मुलीला पळवून नेल्याच्या रागातून जाळपोळ पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून…
अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम पारोळा प्रतिनिधी : दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार NH-53 – हा सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा) पर्यंतचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून जो धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो. आणि हाजिरा बंदराला पारादीप बंदराशी जोडतो. NH-753F – हा महामार्ग जळगावहून पहूर, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वडाळा, अहिल्यानगर, पुणे, मावळ, दिगी पोर्टपर्यंत आहे. जळगावमधून पुणे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या महामार्ग आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबई किंवा नागपूरकडे कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस हायवे अस्तित्वात आल्यानंतर जळगावहून पुण्याला देखील अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होणार…
बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने बिलासपूर-मडगाव, बिलासपूर-वलसाड मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावर प्रत्येकी ८ अशा एकूण १६ विशेष रेल्वे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान धावतील. या गाड्यांना जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसबिलासपूर-मडगाव (०८२४१) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसच्या २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान आठ फेऱ्या होतील. ही रेल्वे प्रत्येक शनिवारी बिलासपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता मडगाव…
संतोष चौधरींचा ‘सस्पेन्स’ आणि मास्टरस्ट्रोक ; फडणवीसांची सभाही ठरली निष्प्रभ! भुसावळ प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल भुसावळ येथे लागला असून मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना पराभवाचा मोठा फटका बसला असून यातून माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या कधी काळच्या चेल्याला धोबीपछाड मारला आहे. भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत यंदा जबरदस्त लढत झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. यावरून विरोधकांनी टिका केली. आणि निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. तर निवडणुकीच्या प्रारंभीच भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा…
उच्च शिक्षित दामिनी सराफ नगराध्यक्षपदी विराजमान फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. एकूण जागांपैकी भाजपाला ९ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत आमदार अमोल जावळे यांच्या वर्चस्वाखाली भाजपाच्या उमेदवार सौ. दामिनी पवन सराफ यांनी १०,०८७ मतांसह दणदणीत विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. कंसात राजकीय पक्ष व मिळालेली मते. प्रभाग १ अ : तडवी हकिम एमत (राष्ट्रीय काँग्रेस) – १,८३७ मतेप्रभाग १ ब : शेख सुमईय्या बी कुरबान (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार…
उद्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींची मतमोजणी व निकाल जळगाव : जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सहा नगरपरिषदांमधील काही जागांच्या निवडणुका न्यायालयीन अपील व इतर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली असून, माघारीनंतर तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी आज शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या नऊ जागांसह २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींतील एकूण ४५२ नगरसेवक पदे तसेच १७ ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निकालाबाबतची नागरिकांची उत्सुकता अखेर संपणार आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे…

