जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जळगाव । जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिक्षण करण्यासाठी हॉटेलवर वेटर म्हणून कामाला असलेल्या तरुणाने राहत्या खोलीमध्ये जीवनयात्रा संपविली. प्रवीण तुलसीदास राठोड (वय १९, रा. आदर्श नगर) असं मयत तरुणाचं नाव असून तो बारावीचे पेपर देत होता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धानवड येथील रहिवासी असलेला प्रवीण राठोड हा तरुण जळगावात हॉटेलवर कामाला होता. वडील बारलेले असल्याने पुढील शिक्षणासाठी तो वेटरचे काम करीत होता. तो बारावीचे पेपर देत होता. हॉटेलमालकाच्या आदर्श नगरातील घरात भाडे तत्वावर सोबत काम करणार्या घेऊन या तरुणासह राहत होता. १९ रोजी रुममधील तरुण बाहेर…
Author: Nilesh Ajmera
जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी, जळगाव । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दिवसेंदिवस घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच शहरातील दोन वाइन शॉपची शटर फोडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत सराईत आरोपी रामनिवास मंजू गुप्ता (३७, रा. कल्याण, जि. ठाणे) याला अटक करून त्याच्याकडून रोख २ लाख ४ हजार रुपये व दुचाकी हस्तगत केली आहे. याबाबत असे की, भजेगल्लीतील विजय चौधरी यांच्या मालकीच्या प्रिन्स वाइनशॉपच्या शटरच्या…
खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स उत्साहात जळगाव : २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या क्रीडांगणावर खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अवयवदानाबद्दल जनजागृती करणे तसेच अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण लाभार्थी यांच्या आरोग्य व जिद्दीचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेत एकूण ४०० विद्यार्थ्यांसह २० अवयवदाते आणि प्रत्यारोपण लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक व्हि. एल. माहेश्वरी (कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), प्राध्यापक एस. टी. इंगळे (प्र-कुलगुरू), दीपमाला काळे (महापौर, जळगाव महानगरपालिका), डॉक्टर नरेंद्र ठाकूर (लोकनियुक्त नगराध्यक्ष, एरंडोल), प्राध्यापक अनिल डोंगरे (अधिष्ठाता, कॉमर्स आणि…
अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वार्षिक पारितोषिक वितरण जळगाव प्रतिनिधी : जळगाव येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री. अे.पी. चौधरी तर उद्घाटक म्हणून जळगाव शहर महापालिकेच्या महापौर सौ. दिपमाला काळे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींनी विविध कौशल्य विकसित करून व्यक्तिमत्व विकासात वाढ करावी, असे आव्हान केले.यानंतर प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अे पी. चौधरी “विद्यार्थिनी सांस्कृतिक…
झोपेची खाट टाकून अनोखे होणारे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या तत्परतेने स्थगित. भुसावळ प्रतिनिधी – सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने तात्काळ कारवाई होण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारदार प्रमोद पाटील यांनी दिला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी तक्रारीची दखल घेत भुसावळ तहसीलदार आणि मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांना लेखी पत्र काढून तात्काळ स्थळ निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल सत्वर सादर करावा असे कळविल्याने खाट टाकून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले . भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार भुसावळ आणि मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांना दिलेल्या लेखी…
विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. चाळीसगाव नेटवर्क – शहरातील न्यायालय परिसरात दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर बापजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण हे प्लॉट व्यवहाराशी संबंधित असून सुमारे ३ लाख रुपये टोकन रक्कम देण्यात आली होती. तर, पुढील खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर थेट न्यायालय परिसरातच ५ ते ६ जणांनी अॅड. समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर न्यायालय…
भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भुसावळ प्रतिनिधी : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ–दादर मार्गावरील विशेष गाड्यांच्या कालावधी पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) यांचा कालावधी २७ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) यांचा कालावधी २८ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे.
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जळगाव शहरात अतिक्रमणधारकांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटविले जात आहे. याच दरम्यान आज शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने जळगाव शहरात अत्याधुनिक नवीन जिल्हा न्यायालय उभारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या शाहू नगर येथील ट्राफिक गार्डन परिसरातील सुमारे सात एकर जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या दरम्यान, आठ गाड्या व इतर वस्तू जप्त करण्यात आले. जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडल्यामुळे प्रशासनाने नवीन इमारतीसाठी या परिसराची निवड केली होती. या जागेवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक आणि गॅरेज व्यवसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला होता, ज्यामुळे…
जळगावात शेतक-यांकडून अवैध वसुली; जिल्ह्यात खळबळ जळगाव । जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. काही दिवसापूर्वी जिल्ह्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली हजारो हेक्टरवर बोगस विमा उतरवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यानंतर आता विमा प्रतिनिधींकडून विमा मंजूर करून देण्याच्या नावाखाली प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांची शेतक-यांकडून अवैध वसुली केली जात असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एका दैनिकांत छापून आलेल्या वृत्तानुसार हा प्रकार जिल्ह्यातील ६० ते ७० महसूल मंडळांमधील ३०० हून अधिक गावांमध्ये सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून नमूद करण्यात आले आहे. एका गावातून सरासरी ३० ते ५० शेतकऱ्यांकडून ५ हजार रुपये वसूल केले जात असल्यामुळे एका गावातून…
केळी दरात मोठी वाढ, आता प्रति क्विंटला मिळतोय ‘इतका’ भाव? जळगाव । मागच्या काही महिन्यापासून केळीला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र आता केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनंतर रमजान ईद व आगामी चैत्र नवरात्रोत्सवाचे पर्व जवळ आल्याने बाजारपेठेत फळांच्या मागणी वाढली असून त्यात खान्देशी केळी सध्या ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. यामुळे केळी दरात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे केळी उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या रमजान ईद महिना सुरु झाला असून याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांना मोठी मागणी वाढली आहे. त्यातही महागडी व स्वादात कमी पडणारी सफरचंद, खरबूज, टरबूज व…

