Author: Nilesh Ajmera

भंगार गोडाऊनला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण जळगाव । धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले.आकाशात धुराचे प्रचंड लोट आणि आगीचे लोळ उसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, गोडाऊनच्या शेजारीच महावितरणचे 132 केव्हीचे सब स्टेशन असल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सुदैवाने आग त्या दिशेने पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच धरणगावसह अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी…

Read More

मी राजपालच्या घरी जाऊन पैशांसाठी अक्षरश: रडलो..! चेक बाऊन्स प्रकरणात पैसे देणाऱ्याने सोडले मौन अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला. याप्रकरणी विविध मुद्दे समोर येत होते, परंतु ज्यांनी त्याला कर्ज दिला, त्यांची बाजू काही व्यवस्थित समजत नव्हती. अखेर राजपालला 5 कोटी रुपयांचं कर्ज देणाऱ्या माधव गोपाल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याच मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2010 मध्ये राजपालला पैसे दिलो होतो, ज्याची परतफेड करण्यात तो अपयशी ठरला होता. आता कॅमेरासमोर येऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. खासदार मिथिलेश कुमार कठेरिया यांच्या माध्यमातून राजपालशी भेट झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी राजपालने त्यांना सांगितलं…

Read More

राज्यात सर्वत्र १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली आहे. मात्र काही ठिकाणी उघडपणे कॉपीचे प्रकार सुरु आहेत. यासाठी शिक्षकच मुलांना मदत करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकार वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयात घडला आहे. वाशिम जिल्ह्यातील ‘टो इथल्या संत मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली. याप्रकरणी आता शिक्षण विभागाने या परीक्षा केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, वाशिम…

Read More

एरंडोल ते धरणगाव महामार्गावरील धुळीने प्रवासी त्रस्त : जीव मुठीत घेऊन प्रवास धरणगाव ते एरंडोल या १२ किलोमीटरच्या मार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. परंतु, या रस्त्यावरील धूळ तसेच खडी, खड्डे यांचा प्रवाशांसह नागरिकांना त्रास होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.एरंडोल ते धरणगाव या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणासह कॉक्रिटीकरणाच्या कामासाठी टोळी गावापासून कमल लॉन्सपर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे. तर रस्त्याचा उरलेला भाग व रूद केलेला कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर उखडलेली खडी, माती व धुळीचे लोट यांना सामोरे जाऊन सर्व वाहनांची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या…

Read More

भुसावळ शहर पोलीस स्टेशनने गुन्हा क्रमांक ०९/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे नोंद केला. भुसावळ प्रतिनिधी : जळगांव: भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हिरोहोंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (नं. एम.एच. ३९/टी. ६१०२) कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. यानंतर फिर्यादी श्री. अॅड. रोकडे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनने गुन्हा क्रमांक ०९/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३(२) प्रमाणे नोंद केला. स्थानिक गुन्हे शाखा जळगांव व भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त तपासात अज्ञात आरोपींचा शोध घेतला गेला. मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बारबोले, पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री. उध्दव डमाळे यांनी…

Read More

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नुपूर महोत्सव’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन भुसावळ प्रतिनिधी : महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नुपूर महोत्सव’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले. नुपूर कथक डान्स अकॅडमी, भुसावळ यांच्या विद्यमाने आयोजित हा महोत्सव डॉ. बी. व्ही. खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे संचालक सुभाष पाटील, शांती विद्यामंदिर फैजपूरच्या अध्यक्षा सौ. शुभांगी महाजन, आंध्र प्रदेश येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय नृत्यकार श्री. रामा कौंडिण्य, अकॅडमीचे संचालक रमाकांत भालेराव व नृत्य शिक्षिका सौ. चारू भालेराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रास्ताविकात रमाकांत भालेराव यांनी अकॅडमीचे…

Read More

महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांची तातडीची बैठक जळगाव | शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांची तातडीची बैठक घेऊन १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री थांबविण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी गरज पडली तर गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. महापौर दालनात सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी व धनराज चावला, डॉ. लीना पाटील…

Read More

जळगाव येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने नेहरू नगर येथील खोलीत गळफास जळगाव । जळगाव येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने नेहरू नगर येथील खोलीत गळ#$फास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा.बोदवड ता. मुक्ताईनगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून घटनास्थळी त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात त्याने आपल्या मृत्यूला महाविद्यालयाचे प्राचार्य यांना जबाबदार धरले आहे. श्याम पाटील हा गेल्या दोन वर्षापासून गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी…

Read More

यावल नगरपरिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तर्फे बेमुदत उपोषण गेल्या ७ दिवसापासून सुरू होते यावल प्रतिनिधी : यावल नगरपरिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तर्फे बेमुदत उपोषण गेल्या ७ दिवसापासून सुरू होते ते उपोषण सोडविण्यासाठी आज लोकनियुक्त अध्यक्षा यांच्यासह सत्ताधारी व विरोधी सदस्यांना यश प्राप्त झाले असले तरी घनकचरा संकलन ठेका टेंडर संदर्भातील फाईल गहाळ झाल्याचे खापर प्रशासक काळातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फोडण्यात आल्याने घनकचरा ठेकेदाराच्या कामकाजाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार यावल हे विविध मागण्यांसाठी यावल नगरपालिकेसमोर गेल्या ७ दिवसापासून उपोषणाला बसले होते.तरी यावल…

Read More

अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चोपडा प्रतिनिधी : चोपडा-विरवाडे रस्त्यावर पहाटेच्या सुमारास एका चारचाकी गाडीला झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना काळाची झडप :मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडे येथील पाच तरुण जैन समाजाच्या पारमार्थिक कार्यक्रमासाठी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चारचाकी गाडीने (क्र. MH 19 BS 1008) चोपड्याकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत या दोन…

Read More