जळगाव जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाखांची मदत जळगाव । नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत सदस्य…
Author: Nilesh Ajmera
लहान भावाला जीवे मारण्याची धमकी! जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला मी तुझे लग्न दुसरीकडे होवू देणार नाही जर तू केले तर तुला व तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. ही घटना फेब्रुवारी २०२५ ते दि. ८ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित सलमान सगीर काकर (रा. पंचशीलनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीचा फेब्रुवारी २०२५ पासून संशयित सलमान काकर हा पाठलाग करीत होता. दरम्यान, दि. ८…
चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना एरंडोल – शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात चार वर्षीय चिमुकली वास्तव्यास असून त्यांच्या घराशेजारीच तीचा मामा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तीला स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी चिमुकलीसोत घृणास्पद कृत्य करीत तिच्यावर अत्याचार केला काही वेळानंतर चिमुकल्या मुलीची आई घरी आल्यानंतर तिला मुलगी दिसून न आल्याने तीने आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये तिचा शोध यावेळी तिला भावाच्या घरात चिमुकली मिळून आली.…
३१ मार्चपर्यंत कर्जफेडीची अट; १.६४ लाख शेतकरी ५० हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र जळगाव प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीककर्ज घेतलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेने घेतला आहे. यावर्षी वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बँक व्याज आकारणार नसल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. १.६४ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ बँकेच्या या निर्णयाचा लाभ एप्रिल २०२५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांनी एकूण १०७२ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यावरील सुमारे ६४ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज सध्या बँक घेणार नाही. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना…
धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…! मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत काही काळासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते आणि कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षा तपास पूर्ण करत हळूहळू कर्मचाऱ्यांना पुन्हा आत सोडण्यात आले. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू…
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ? पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपावरील आर्थीक गैरव्यवहार झालेल्या काळात उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांनी मुलाच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सोने देखील खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अपहाराचा पैसा संशयित वाल्मिक वाघ यांनी सोने किंवा अन्य कोणाच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे तपासधिकारी पोनि राहुल गायकवाड यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस दलातील वेल्फेअरतर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता…
सिलेंडरसाठी ३–५ दिवस प्रतीक्षा; हॉटेल व्यवसाय अडचणीत, व्यावसायिक गॅस बंदीची अफवा फेटाळली जळगाव | आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले आहेत. राज्यात घरगुती एलपीजी, व्यावसायिक गॅस आणि सीएनजीच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला असून सिलेंडरसाठी ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा…
निवास, भोजनासह पुस्तके ही मिळणार विनामूल्य; सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प जळगाव । “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओवी खऱ्या अर्थाने जगण्याचे कार्य फैजपूर येथील संत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी आता खानदेशातील पन्नासहून अधिक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण निशुल्क दिले जाणार आहे. जळगाव ,धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी थांबावे लागू नये तसेच यांच्या जीवनात यशाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी फैजपूर येथील प्रसिद्ध…
राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली जळगाव । प्रख्यात उद्योगपती व कृषी क्षेत्रातील तत्त्वचिंतक नंदकिशोर कागलीवाल यांना भारतीय कृषी क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल राजस्थान राज्य कृषी विद्यापीठ यांच्याकडून विज्ञानातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजी जयपूर येथे हा सोहळा संपन्न झाला. भारतीय बियाणे उद्योगाच्या विकासामध्ये केलेले त्यांचे अग्रगण्य कार्य, तंत्रज्ञान-संलग्न उच्च उत्पादकता व कीड-प्रतिरोधक बियाण्यांचा प्रसार तसेच ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा गौरव या सन्मानाद्वारे करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे देशभरातील असंख्य शेतकरी व समाजघटकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झाला आहे.मागील वर्षी, कागलीवाल यांना सेज विद्यापीठ, भोपाळ…
ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात!.. आपल्या जीवनातील दुर्गुणांची होळी करा,आणि सात्विक जीवन जगा!. जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील गुरुदेव सेवाश्रमच्या चैतन्य धाम येथे रंगपंचमी निमित्त भव्य लेंगी नृत्य स्पर्धा व धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातून महिला भगिनी, पुरुषवर्ग आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी संबोधन करताना चैतन्य धामचे निर्माते श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, “मी काहीच करत नाही… ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात.” त्यांच्या या अमृत वचनांनी उपस्थित भाविक भक्तांचे डोळे…

