गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक : जळगाव : पत्रकारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’ची महत्त्वपूर्ण बैठक दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट…
Author: Nilesh Ajmera
महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळेंची निवड.. जळगाव । जळगाव महानगरपालिकेत भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही गटनेता जाहीर केला आहे. गुरुवारी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने दमदार कामगिरी केली. या निवडणुकीत शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मुसंडी मारली आहे. या विजयामुळे जळगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात…
राज्यातील महापालिकांच्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा सविस्तर कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवड कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांची निवड प्रक्रिया कशी असणार, पाहुयात…. २२ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकांचं महापौर पदाचा आरक्षण सोडत… २३ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसचिवांची महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांचे प्रथम बैठक बोलवण्यासाठी तारीख व वेळ निश्चितसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) २४ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्तांकडून महानगरपालिकांच्या पहिल्या सभेची…
‘फ्लाय ९१’कडून तयारी अंतिम टप्प्यात जळगाव : महाराष्ट्रातील वेगाने विकसित होत असलेल्या विमानतळांपैकी एक असलेल्या जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई, पुणे, गोवा आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता जळगावकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी असून, जळगाव लवकरच थेट विमानसेवेद्वारे इंदूरशी जोडले जाणार आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगाव–इंदूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, या विमानफेरीचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव विमानतळावर अलीकडेच नाईट लँडिंगसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुधारित पायाभूत सुविधांमुळे नवीन विमान कंपन्यांना जळगावहून सेवा सुरू करणे…
जळगाव हादरले: जीवे मारण्याची धमकी ! जळगाव प्रतिनिधी – जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आला असून, शहरातील मध्यवर्ती भागातील ‘हार्ट प्लस’ रुग्णालयात एका ३० वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. संदीप भारुडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती भारुडे यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गेल्या सहा महिन्यांपासून, म्हणजेच २१ जुलै २०२५ पासून डॉ. संदीप भारुडे हे संबंधित पीडितेला अश्लील चाळे करून त्रास देत होते. वारंवार पाठलाग करणे आणि कामाच्या ठिकाणी बळजबरीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, अशा तक्रारी पीडितेने दिल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, जेव्हा पीडितेने…
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार; २ आरोपींना अटक ! पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.मे २०२५ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत पवन संजय परदेशी आणि प्रथमेश पाटील या दोघांनी पीडितेचे लैंगिक शोषण केले. याशिवाय विकी शिवाजी राजपूत नावाच्या तिसऱ्या आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला. पीडितेने हिंमत दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुलकुमार निहाळ यांनी तातडीने…
कविता पाटील,उज्वलाताई बेंडाळे ,माधुरी बारी व दीपमाला काळे यांची नावेही चर्चेत; जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेत भाजप–शिवसेना महायुतीची सत्ता निर्विवादपणे स्थापन झाली असून भाजपचे ४६ तर शिवसेनेचे २३ असे एकूण ६९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणार हे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच आज मुंबईत झालेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत जळगाव महापालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण जाहीर झाल्याने आता ओबीसी महिला महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.जळगाव शहराचे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा प्रभागातून निवडून आलेले, एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ता सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता सागर पाटील हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आरक्षण जाहीर होताच…
कविता पाटील,उज्वलाताई बेंडाळे ,माधुरी बारी व दीपमाला काळे यांची नावेही चर्चेत; जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेत भाजप–शिवसेना महायुतीची सत्ता निर्विवादपणे स्थापन झाली असून भाजपचे ४६ तर शिवसेनेचे २३ असे एकूण ६९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणार हे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच आज मुंबईत झालेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत जळगाव महापालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण जाहीर झाल्याने आता ओबीसी महिला महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.जळगाव शहराचे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा प्रभागातून निवडून आलेले, 22 वर्षीय तरुण, एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ता सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता सागर पाटील हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.…
महाजन दांपत्य थोडक्यात बचावले…. जळगाव महापालिकेच्या माजी महापौर तसेच भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे जळगावकडे परतत होते. यावेळी नाशिक–जळगाव प्रवासादरम्यान मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावजवळ हा अपघात झाला. समोर चालणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे महाजन दाम्पत्यांची कार पुढील वाहनावर आदळली. मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि महाजन दाम्पत्य थोडक्यात बचावले. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. तथापि, जयश्री महाजन, सुनील…
मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली गुडन्यूज जळगाव । २१ जानेवारी २०२६ । राज्य सरकारने २०२४ साली राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना वेळोवेळी eKYC करावी लागते. केवायसलीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत. केवायसी करुनदेखील पैसे मिळत नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आहे. दरम्यान, आता महिलांच्या या नाराजीनंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत याबाबत…

