जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदारसंघातील सावदा सर्कल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदारसंघातील सावदा सर्कल मधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची रक्कम खात्यात जमा झालेली नाही, त्या संदर्भात शेतकरी बांधवांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे यांच्याशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. संबंधित अधिकारी वर्गाशी देखील चर्चा करण्यात आली असून, येणाऱ्या काही दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम वर्ग केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ‘याप्रसंगी नंदूभाऊ महाजन (भाजपा लोकसभा प्रमुख), शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील,शिवसेना विनोदभाऊ तराळ, शिवाजी पाटील, सावदा परिसरातील शेतकरी बांधव तसेच शिवसेना-भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Nilesh Ajmera
आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून अशातच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. जळगाव शहरातील जि.एम.फाऊंडेशन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भास्कर पाटील यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत पोलीस दलाची प्रतिमा उंचावली. त्यांच्या कार्यामुळे जळगाव शहर व परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला असून सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते आहे.दरम्यान, भास्कर पाटील आगामी निवडणुकीत ते थेट मैदानात उतरण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
नशिराबाद पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे. जळगाव । नशिराबाद (ता. जळगाव) येथील पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून योगिता मधुकर नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या पोलीस खात्यातील प्रशासकीय बदलांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे. API योगिता नारखेडे या कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी सेवा बजावताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण, महिलांसाठी सुरक्षितता तसेच जनतेशी समन्वय साधून काम करण्यावर भर दिला आहे. नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व…
जळगावमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा इशारा जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला असून, प्रमुख राजकीय पक्षांच्या मुलाखतींचे सत्र पार पडले आहे. मात्र, तिकीट वाटपाचा अंतिम निर्णय जवळ येत असतानाच शहरातील विविध प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला स्पष्ट संकेत दिले आहेत- “जर वशिलेबाजीमुळे किवा कोणाच्या सांगण्यावरून आमचे तिकीट कापले गेले, तर बंडखोरी अटळ आहे.” एक निष्ठ नवलच का? यामुळे आता अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. निष्ठेने काम करणाऱ्यांची उपेक्षा नकोजळगाव शहरात अनेक इच्छुकांनी गेल्या काही वर्षांपासून आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवला आहे. पक्षाचे…
मुलगा झाला नाही म्हणून पोटच्या ३ दिवसांच्या मुलीची बापाने केली हत्या ! जामनेर प्रतिनिधी : मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली आहे. चौथीदेखील मुलगीच झाली या रागातून एका निर्दयी बापाने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची निघृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. याला आधीच ३ मुली आहेत. चौथ्या वेळी मुलगा होईल, अशी त्याला आशा होती. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही,…
मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय मंत्रीमंडळाने नगराध्यक्षा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झालेली असेल तर तिची दोन्ही पदे कायम राहतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार असेल. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल. एखादी व्यक्ती थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली असेल व त्याचवेळी एखाद्या वॉर्डातून ती नगरसेवक म्हणूनही विजयी झाली असेल आणि नगराध्यक्ष म्हणून तिच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तरी ती नगरसेवक म्हणून कायम राहील.
पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून पोलिसांनी…
मतदारांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी मनपा प्रशासनाची रील मेकिंग स्पर्धा जळगाव प्रतिनिधी : शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने “विकासासाठी मतदान नक्की करा” हा संदेश घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणाऱ्या या उपक्रमाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेत मतदान जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट रिल्स तयार करणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ३ हजार रुपये रोख, तर द्वितीय पारितोषिक म्हणून २ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली असून…
चार साधू ताब्यात लुटीचा प्रकार उघड अमळनेर प्रतिनिधी : साधूंच्या वेशात शहरात दाखल होऊन दुकानदारांना विविध सुगंध व औषधांचा वास देत गुंगी आणून पैसे व वस्तू लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा तरुणांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांनी या ढोंगी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर पोलीस ठाण्यातही त्यांना ‘महाप्रसाद’ देण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ रोजी अमळनेर शहरात चार ते पाच साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली होती. धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात समर्थ ट्रेडिंगचे मालक जितेंद्र पाटील यांच्याजवळ हे साधू गेले. त्यांनी टिळा लावून कशातरी सुगंधाच्या किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाच्या नावाखाली दुकानदाराला वश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर…
निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई जळगाव एमआयडीसी व निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई करत ६८ लिटर गावठी दारूसह देशी मद्याचा साठा जप्त केला. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदेशीर मद्याचा पूर वाहण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानंतर जळगाव विभागानेही कारवाईचा बडगा उचलला आहे. नववर्ष व निवडणूक काळात शहरात अवैध मद्य येऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पाच विशेष फिरती पथके तैनात केली आहेत. जळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर या पथकांचा वॉच असणार आहे.…

