Author: Nilesh Ajmera

पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. जळगाव । चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. या मोहिमेत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अनेकवेळा कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना दिसून आल्या आहे. दरम्यान, गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती…

Read More

काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. जळगाव । जळगाव–पाळधी बायपासवर विचित्र अपघात घडला. काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली असताना भरधाव ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. दोन्ही बाजूने अपघात झाल्याने…

Read More

‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” जळगाव प्रतिनिधी । “माझ्या वडिलांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवशील का, असा प्रश्न विचारला आणि मी ‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” असे भावनिक प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे सन २०२० बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. मंदाकिनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत…

Read More

जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. जळगाव प्रतिनिधी । येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या सीए शाखेला पश्चिम भारत क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट शाखा म्हणून “प्रथम” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक व समाजाभिमुख उपक्रमांच्या जोरावर जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. मुंबई येथे मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ७६ व्या भव्य वार्षिक सोहळ्यात पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळ (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) यांच्या वतीने जळगाव सीए शाखेचा गौरव करण्यात…

Read More

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, जळगाव प्रतिनिधी | ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या प्रशिक्षणात शासन निर्णयातील विविध तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक…

Read More

जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा जळगाव । जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉफीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे खुलासा मागवण्यात आला असून खुलासानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक…

Read More

जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ जळगाव शहरातील प्रभाग क्र. ९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ सुरु केला आहे. आज त्यांनी देवराम नगर परिसरातील मुख्य गटारीची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रभागातील अनेक गटारी तुंबल्या असल्यामुळे नागरिकांना घरात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. नगरसेविकेच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागाने ताबडतोब जेसीबीद्वारे गटारी साफ करण्याचे काम सुरू केले. जयश्री पाटील यांनी या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आगामी दिवसांत प्रभागातील सर्व तुंबलेल्या गटारी लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की,…

Read More

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. भोंगऱ्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. खान्देशात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये होळीच्या उत्सवाची रंगत चढू लागली असून पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा स्वर पुन्हा एकदा दऱ्याखोऱ्यांत घुमू लागला आहे. खान्देशातील आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्व असलेला हा उत्सव उत्साह, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भोंगऱ्या बाजाराची सुरुवात झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून सांस्कृतिक परंपरांचा महोत्सव असतो. आदिवासी…

Read More

सिंधुताई कोल्हे यांच्याकडे महिला बालकल्याण,डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हाती स्थायी समितीचा कारभारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय…

Read More

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव,दीपनगरचे महानिर्मिती मुख्य अभियंता यांच्याकडे दि.,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले यावल प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी भुसावळ येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश ब्राह्मणे यांनी संबंधितांकडे लेखी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव,दीपनगरचे महानिर्मिती मुख्य अभियंता यांच्याकडे दि.,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील ६-७ दिवसांपूर्वी दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पावर जनतेचा हजारो कोटी रुपयांचा निधी…

Read More