Author: Nilesh Ajmera

बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती रावेर प्रतिनिधी : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती व सातपुड्यातून ज्ञानाची गंगा प्रगट करणारे परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या संकल्पनाने आणि विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समिती आयोजित भक्ती सभा तसेच महाशिवरात्री पर्व बंजारा बांधव तसेच भाविक भक्तांतून या त्रिवेणी अध्यात्मिक महोत्सवाचे रावेर येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले . सकाळपासूनच शहरात दहा वाजेपासून याचे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीची सुरुवात दुपारी बारा वाजता पाराचा गणपती येथून करण्यात आली.…

Read More

यावल नगरपरिषद कार्यालयासमोर १० फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू यावल प्रतिनिधी : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता आपल्या हक्कांसाठी थेट लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. यावल नगरपरिषद कार्यालयासमोर १० फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.हे आंदोलन अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन सुरेश बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कर्मचाऱ्यांनी उपोषण छेडले आहे. काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या? संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे ठळकपणे मांडले आहेत:किमान वेतनाचा तात्काळ लाभ पीएफ, ग्रॅच्युइटी व इतर कायदेशीर सुविधा नियमित व वेळेवर पगार सुरक्षा साधने व…

Read More

खाकीतील सुरेल गायक ज्यांनी जळगांव जिल्ह्याचे नाव देशविदेश पातळीवर लौकिक केले, भुसावळ/ प्रतिनिधी :- खाकीतील सुरेल गायक ज्यांनी जळगांव जिल्ह्याचे नाव देशविदेश पातळीवर लौकिक केले, पोलिस दलातील कर्तव्य सांभाळून कलाक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या या दर्दी गायकाचा नुकताच उत्कर्ष कलाविष्कार तसेच ओबेनॉल फाउंडेशन या नामांकित संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला. खान्देशनाट्य महोत्सव 2026 च्या औचित्य साधून या पर्वापासून सदर पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य ना.संजयभाऊ सावकारे ,अश्विनकुमार परदेशी, नाहटा कॉलेजचे चेअरमन मोहन फालक,श्रीमती नम्रता परदेशी,राधेश्याम लाहोटी,शकील हसरत आदी उपस्थित होते. याप्रसंगी संजय सावकारे यांनी पुरस्कारार्थी यांना शुभेच्छा देत संघपाल तायडे यांचे व्हिडिओ मला मंत्रालय तसेच बाहेर राज्यातून…

Read More

महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असून अशातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. जळगाव । गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असून अशातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार असून, येत्या ३० जूनपूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्जमाफी कशाप्रद्धतीने लागू करावी, यासाठी सरकारकडून प्रविण परदेशी समिती स्थापन करण्यात आली होती. आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला…

Read More

शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा वाद केवळ स्थानिक कारवाईपुरता मर्यादित न राहता, आता थेट राज्याच्या गृहखात्याशी जोडला गेला आहे. सावदा परिसरात वाळू आणि इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी काही वाहने पकडली होती. या कारवाईत काही निष्पाप लोकांना त्रास दिला जात असल्याचा दावा करत एकनाथ खडसे…

Read More

जाळपोळ व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश भडगाव : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरदेवळा येथे एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याची गंभीर घटना घडली होती. सदर कृत्यामुळे परिसरात निर्माण झालेले दहशतीचे वातावरण आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास चक्र फिरवून मुख्य सूत्रधारासह आरोपींना निष्पन्न करून अटक केली आहे. पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु. र. नं. ५७/२०२६ कलम भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (ग) फिर्यादी- किरण उमेश राऊळ व त्यांची आई घरात झोपलेल्या असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग…

Read More

यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. जवळपास २१ ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान या कारवाईने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून…

Read More

धान्यातून प्रती कार्ड एक किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. धानोरा, ता. चोपडा : येथे रेशन वितरण व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, परिसरातील काही रेशन वितरकांकडून कार्डधारकांची दिवसाढवळ्या फसवणूक होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला मिळणाऱ्या धान्यातून प्रती कार्ड एक किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गरीब व गरजू नागरिकांना मोफत किंवा अनुदानित दरात धान्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत गहू, तांदूळ आदी जीवनावश्यक धान्याचे वाटप…

Read More

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत पीडित कुटुंबांचा संसार अक्षरशः भस्मसात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाठ आणि बापू शंकर शिरसाठ यांची घरे आहेत. रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार प्रथम शॉर्टसर्किट झाले असून त्यानंतर गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळांनी…

Read More

शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले बोदवड – ऑनलाइन कर्ज अॅपवरून कर्ज घेणे शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल व संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती अॅपवर…

Read More