Author: Nilesh Ajmera

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मध्यरात्री धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ रोजी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगावहून भुसावळकडे अवैध वाळू वाहतूक करणारे चार डंपर व १ मुरूम वाहतूक करणारे डंपर नशिराबाद टोल नाका येथे प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह पथकाने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्रत्येक डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू आढळून आली. संबंधित चारही डंपरचा पंचनामा करून वाहने जप्त करण्यात…

Read More

अर्थसंकल्प २०२६-२७ हा महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी : ना. रक्षा खडसे मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी व्यक्त केले आहे. युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार प्रमुख स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून, राज्याला ‘आर्थिक महासत्ता’ बनवण्याच्या दृष्टीने तो मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रासाठी १५,९४० कोटी रुपयांची…

Read More

मालेगाव महापालिकेची कोसळली लिफ्ट; मोठा अनर्थ टळला नाशिक | महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीत मोठी दुर्घटना घडली. इमारतीतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये एकूण १८ जण अडकले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळताना थेट तळमजल्यावर न आदळता पहिल्या मजल्यावर तिचा दरवाजा अडकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरुप राहिले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकेक करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे असिफ…

Read More

अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने राज्यात मोठी खळबळ; २२ तलाठींसह ३१ जण जेरबंद… जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सरकारी अनुदानातील तब्बल २५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भांडाफोड झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत ३१ जणांना अटक केली असून यामध्ये तब्बल २२ तलाठी, ५ महसूल विभागातील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी तसेच काही संगणक तज्ज्ञांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट लाभार्थी तयार करून अनुदानाची रक्कम स्वतःच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या खात्यावर वळविल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, काही लाभार्थ्यांच्या नावावर…

Read More

भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी ! पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे न्यायालयात गैरहजर राहिले. कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे न्यायालयाने ही अनुपस्थिती गंभीर मानत थेट अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला. मात्र, खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे सुनावणीला उपस्थित होते. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्याविरोधात यापूर्वीच आरोपपत्र…

Read More

भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता तसंच प्रवाशांची होणारे गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी पूर्णतः अनारक्षित असून विदर्भ आणि खानदेश या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गावरून हजारो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक रेल्वे ठरणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११०१ ही अनारक्षित भुसावळ नागपूर मेमो विशेष गाडी शनिवारी सात वाजून पन्नास मिनिटांनी भुसावळ येथून सुटेल आणि नागपूर येथे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११०२ नागपूर भुसावळ विशेष…

Read More

घात की अपघात? अपघाताच्या आदल्या रात्री काय घडलं? दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही घातपात, याबाबत संशय अधिक गडद होत चालला आहे. विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या CID पथकाने गुरुवारी अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान CID चा संपूर्ण रोख हा अपघाताच्या आदल्या रात्रीच्या घटनांवर होता. २७ जानेवारी रोजी अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? त्या…

Read More

पाणी पुरी खाताय ? तर सावधान ! १६ जणांना विष बाधा… लहान मुलांचाही समावेश ! जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना फूड पॉइझनिंगचा (विष बाधा) त्रास झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ही जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात घडली. त्या भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरीचा गाडा लावला होता. परिसरातील नागरिकांसह अनेक लहान मुलांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. मात्र काही वेळातच पाणीपुरी खाल्लेल्या नागरिकांना अचानक उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. त्रास…

Read More

मारवड पोलिसांत गुन्हा दाखल अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला (वय २४ वर्षे) ही मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी असून ती सध्या भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका झोपडीत ती एकटी असताना, संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) याने तिला गाठले. पीडित महिला ही तिथे एकटीच आहे, याची माहिती असतानाही आरोपीने तिला…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा २०२६ सेवाभाव, कृतज्ञता व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी होते. प्रमुख उपस्थितीत विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा सचिव तथा दैनिक महासागर जिल्हा प्रतिनिधी प्रवीण बलकी यांचा समावेश होता. यावेळी प्रमुख अतिथी…

Read More