Author: Nilesh Ajmera

ब्रेकिंग न्यूज: राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रावर शोककळा ! ​बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळासह सर्वत्र मोठी शोककळा पसरली आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीवर प्रचंड वेगाने आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ​सहा जणांचा मृत्यू ​प्राथमिक अहवालानुसार, या विमानात…

Read More

जळगाव महापौरपदी कुणाची वर्णी? ‘ओबीसी महिला’ आरक्षणामुळे राजकीय सारीपाट तापला; जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘ओबीसी महिला’ आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय राजकीय गणिते वेगाने बदलत असून, भाजपच्या गोटातून महापौरपदासाठी चार प्रबळ दावेदार मैदानात उतरल्याने ही लढत आता अधिक चुरशीची झाली आहे. ​दोन नव्हे, आता चार दावेदार! ​सुरुवातीला ही लढत केवळ दोन नावांभोवती मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या एन्ट्रीमुळे आता चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे: ​कविता सागर पाटील: पिंप्राळा या बालेकिल्ल्यातून २२ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर कार्यकर्ते सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या…

Read More

थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या जळगाव । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंर्तगत पात्र महिला दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून या योजनेचे पैसे थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये संक्रातीपूर्वी मिळाले. मात्र या योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यातच जळगावमध्ये लाडक्या बहिणींनी आक्रमक झाल्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात घुसल्या आहे. लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या…

Read More

विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली जळगाव । भुसावळ तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळून आले. गावालगत असलेल्या विहिरीत मुली आढळून आल्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून याप्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे. काय आहे घटना?भुसावळ तालुक्यातील साकरी येथील दोन्ही अल्पवयीन मुली जनता विद्यालयात इयत्ता 9 वीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगत असलेल्या सोपान फेगडे यांच्या शेतीतील विहिरीत…

Read More

अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींचे वाचणार प्राण : रस्ता सुरक्षेला मिळणार नवी दिशा जळगाव : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावे यासाठी सरकारने. उपाययोजना केल्या आहेत. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे, तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचविणाऱ्या मदतनिसाला ‘राहवीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यात केल्या ६१ दुरुस्त्यारस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, यामुळे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे. अपघात आणि मृतांची संख्या कमी करण्याचा प्रयत्नकॅशलेस…

Read More

भारत माता पूजन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप जळगांव : २६ जानेवारी रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिववंदन फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर येथील काळे नगर परिसरात भारत माता पूजन व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू मामा भोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदौर येथील नामवंत व्यावसायिक चंद्रकांत कुंजिर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक विजय जगताप व निलेश तायडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना आमदार राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशसेवेची भावना जोपासावी, असे मार्गदर्शन…

Read More

जळगावच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतिकारी पाऊल; जळगाव । जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश आहे. सुरू झालेले 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीन म्हणजे जळगावच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतिकारी पाऊल असून अपघात, हृदयरोग, मेंदूविकार यासारख्या गंभीर आजारांमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. ही सुविधा त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत…

Read More

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले’रिपोर्ट कार्ड; जळगाव | जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीचा डंका आज पुन्हा एकदा राज्यभर वाजला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये ना. गुलाबराव पाटील यांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ५७ मंत्रालयीन विभागांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, ज्या जिल्ह्याचे नेतृत्व पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील करत आहेत, त्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात दुसरा मानाचा तुरा खोवला आहे. २०० पैकी मिळाले १७०.५० गुण (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल) महाराष्ट्र शासन आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया…

Read More

करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जळगाव । राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI व Block Chain चा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा एकूण सात सर्वंकष निकषांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलेल्या या निकालात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव याची राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील…

Read More

मुळे भुसावळ-बडनेरा मेमूसह अनेक गाड्या रद्द अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल जळगाव – भुसावळ-बडनेरा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे ३० जानेवारी रोजी भुसावळ-बडनेरा मार्गावरील मेमूसह काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन (वेळ बदलणे) करण्यात येणार आहे. ​रद्द करण्यात आलेल्या गाड्या ​जलंब स्थानकावरील कामामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या खालील गाड्या रद्द राहतील:६११०१/६११०२ भुसावळ-बडनेरा-भुसावळ मेमू. , १११२१/१११२२ भुसावळ-वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस. , ०१२११ बडनेरा-नाशिक रोड विशेष ट्रेन (३० जानेवारी). ,०१२१२ नाशिक रोड-बडनेरा विशेष ट्रेन (२९ जानेवारी). ​या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल​ब्लॉकच्या कालावधीत काही…

Read More