Author: Nilesh Ajmera

दारूसाठी पैसे नाकारल्याने वृद्धावर शस्त्राने हल्ला; गुन्हा दाखल ! जळगाव – शहरातील संत चोखामेळा बोर्डिंग जवळील पेट्रोल पंपासमोर एका ५५ वर्षीय व्यक्तीवर दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून टोकदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी दिनेश काशीनाथ अहिरे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त जात असताना, आरोपी शेखर मराठे (रा. कासमवाडी, जळगाव) याने त्यांना सार्वजनिक रस्त्यावर अडवले. आरोपीने अहिरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र,…

Read More

३० हजार लिटर संशयास्पद ‘इंधन’ जप्त ! भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाला यश आले आहे. १८ जानेवारी रोजी प्रशासनाने टाकलेल्या धाड सत्रात तब्बल ३० हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टैंकर जप्त करण्यात आला असून, एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांचे धाबे दणाणले आहेत. नेमके प्रकरण काय ?भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’…

Read More

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे प्रवाशांचे वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला असून दोन मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे या धावणार आहेत. विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणजे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता., भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय हा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा…

Read More

महिनाभर भाविकांनाची रेलचेल : नवस फेडण्यासाठी होणार गर्दी यावल : तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान यात्रोत्सव 19 जानेवारी सोमवारपासून सुरु झाली आहे. माघ शुद्ध महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानंतर शनिवार दि. 24 रोजी, सोमवार दि. 26 रोजी, शनिवार दि. 31 असे चार वार असून 1 फेबुवारीला पौणिमेला यात्रेचा समारोप होईल. अट्रावल- भालोद रस्त्यावर अनेक वर्षापासून जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना -दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्चित करावी लागते. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली…

Read More

महेश्वर रेड्डी यांनी १९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली जळगाव प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यासाठीगेलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांत चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इराणी टोळी’वर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राबवलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये पोलिसांनी ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि १६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला :घटनेची सुरुवात १५ जानेवारी रोजी झाली, जेव्हा मध्यप्रदेशातील बडोद पोलीस ठाण्याचे पथक करारअली हुजूर…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. जळगाव प्रतिनिधी । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून नेमून दिलेली कामे वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी…

Read More

२९ महापालिकांतील सत्तासमीकरणांवर परिणाम; राजकीय हालचालींना वेग जळगाव प्रतिनिधी : राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण सोडत काढली जाणार असून, यामुळे महापौरपदासाठीच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची अधिकृत सूचना जारी केली आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोदतीनंतर संबंधित महापालिकांचे आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्यानुसार सभागृह बैठकीची तारीख निश्चित केली जाईल आणि पहिल्याच बैठकीत महापौरांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, नव्याने गठीत झालेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता इतर सर्व…

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली. पारोळा । तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4 हजार 907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली, आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती समोर आलीय. बांगलादेशी आणि रोहिंगयांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी…

Read More

पहाटेच्या शुभमुहूर्तावर अभिषेक पूजनाने यात्रेला प्रारंभ जळगाव | MahaLive News : किनगाव येथे आज सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आई भवानी मातेची यात्रा सुरू झाली आहे. यावर्षी यात्रेची सुरुवात नव्या परंपरेने झाल्याने गावात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगून गेले आहे.पहाटे पाच वाजता मातेचा ध्वज,गावात दोनदा परिक्रमा भवानी मातेच्या शिष्टमंडळाच्या नियोजनानुसार, या वर्षी यात्रेची सुरुवात विशेष पद्धतीने झाली. पहाटे पाच वाजता भवानी मातेचा ध्वज ढोल–ताशांच्या निनादात गावात दोन वेळा फिरवण्यात आला.गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून यात्रा अधिक भक्तिमय झाली.ध्वज परिक्रमेच्या नंतर चार वाजता अभिषेक–पूजन या वर्षी प्रथमच नवीन परंपरेनुसार ध्वज परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर, पहाटे चार वाजता (विशेष शुभमुहूर्तावर) भवानी मातेच्या मंदिरात अभिषेक व…

Read More

प्रजासत्ताक दिनी ,२,५०० कलाकारांचे सादरीकरण जळगाव । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन जयघोषांनी दुमदुमणार आहे. परेडची संकल्पना ‘वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र’, , ‘वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. ३० सजीव देखावे असंतील, त्यापैकी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील, तर १३ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील. याव्यतिरिक्त, अंदाजे २,५०० कलाकार सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. यावर्षी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-युरोप संबंधांना चालना मिळेल. गेल्या वर्षी परेडमध्ये सहभागी होऊ न शकलेली अनेक राज्ये यावेळी त्यांचा सांस्कृतिक वारसा दाखवतील. यामध्ये…

Read More