संतांचे जीवन परोपकारी आणि कल्याणकारी असते महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज पाल.रावेर प्रतिनिधी : ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं सारख्या दिव्य दैवी आत्म्यांचे स्मरण केल्याने हृदय आनंदाने भरून जाते. बापूजीनीं चैतन्य साधक परिवार ची स्थापना करून देशभरातील लाखो भक्तांना आध्यत्मिक जीवन जगण्याची कला अवगत करून उद्धार केला. पूज्य बापूजी स्वतः भौतिक वस्तू चा त्याग करून ईश्वरिय शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि जनकल्याणकरिता विराट संकल्प करीत साक्षात परमेशवराचे दर्शन प्राप्त करून अज्ञानरूपी अंधःकारात भरकलेल्या मानवी जीवाला ज्ञानाच्या प्रकाशात आणले. आज त्यांच्या सानिध्यात पूज्य बाबाजी माता नर्मदेची प्रदक्षिणा करण्याचा कठीण संकल्प पूर्ण करत आहेत. यापेक्षा विशेष श्रद्धांजली असू शकत नाही. बापूजींनी…
Author: Nilesh Ajmera
मुक्ताईनगरात बनावट नोटाही मोठया प्रमाणात हस्तगत मुक्ताईनगर प्रतिनिधी : समाजमाध्यमांवरून “एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी चा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे .या कारवाईत त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कुन्हा दुरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवरून आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केले होते. या व्हिडीओंमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते.…
वाहनांची मोठी गर्दी झाल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. जळगांव शहरातील खाजा मिया चौक परिसरात आज संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता तब्बल अर्धा तास ट्रॅफिक जाम निर्माण झाला. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. प्रमुख वेळेत जाम सुटण्यास विलंब झाला असून ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी क्षणभर अनुपस्थित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अचानकच्या जाममुळे कार्यालयातून घरी जाणारे वाहनचालक तसेच सामान्य नागरिक त्रस्त झाले.स्थानिक नागरिकांनी ट्रॅफिक व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खाजा मिया चौकात संध्याकाळी साडेसहा वाजता अर्धा…
भयंकर ! कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे.. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एक भीषण बस अपघात झाला. बेंगळुरूहून गोकर्णला जाणारी खाजगी एसी स्लीपर बस कंटेनर लॉरीशी धडकली आणि त्यात आग लागली.या अपघातामध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत. खासगी बस बंगळुरूहून गोकर्णाला निघाली होती. त्याचवेळी एक कंटेनर बंगळुरूकडे निघाला होता. हिरियुर येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटला अन् डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की बसचा चक्काचूर झाला अन् आग लागली. खासगी स्लीपर बसमध्ये आगीचा तांडव उडाला. कंटेनर…
नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. जळगाव : नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. विरोधकांचा वाढता आत्मविश्वास आणि संभाव्य धोके लक्षात घेत भाजप आणि शिंदेसेनेने महापालिका निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका निवडणूक राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली असून महायुतीतील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत. अर्थात भाजप आणि शिंदेसेनेने युतीची घोषणा केली आहे. दरम्यान, बैठकीत महापालिका निवडणूक युतीत लढण्यावर सकारात्मक चर्चा झाली. आमची महायुती निच्छित होईल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाशी चर्चा करून जागावाटपाची घोषणा केली जाईल. भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीशी चर्चा करतील. ही बैठक पूर्वनियोजित होती, अशी माहिती पालकमंत्री…
स्वबळावर लढण्याची तयारी,109 जणांच्या मुलाखती जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा होत असली तरी राज्यातील सत्ताधारी तिसऱ्या मित्र पक्षाने अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वबळाची तयारी केली जात आहे. बुधवारी 24 डिसेंबर रोजी पक्ष कार्यालयात मुलाखतींसाठी ईच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसून आली. राज्यात नुकतेच नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे महापालिका निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी ताकद अजमावण्याच्या तयारीत आहे. राज्यासह जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा होत आहे. या युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसल्याचे दिसत असल्याने पक्षाने महापालिकेच्या जागा ह्या…
आत नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरदेखील संपत आला आहे. राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. ऑक्टोबर २०२५ महिन्याचे हप्त्याचे १५०० रुपये नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरदेखील संपत आला आहे. तरी तरीही अजून लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता त्यात जानेवारीचा हप्तादेखील मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला तर महिलांना ३ महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. महिलांच्या खात्यात…
जामीन अर्ज जिल्हा न्यायालयातर्फे नामंजूर करण्यात आले जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहात आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधी कोल्हे जामीनावर बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या बोगस कॉल सेंटरप्रकरणी जळगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. याच पार्श्वभूमीवर ललित कोल्हेंसह सूत्रधार अकबर व हॅण्डलर आदिल या तिघांचे जामीन अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळले. काय आहे प्रकरण?२८ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकला होता. तिथे सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक…
निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुकांची महापालिकेत मोठी गर्दी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुक उमेदवारांची जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला तसेच शासकीय ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ६१८ जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. पहिल्या दिवशी ७७७ अर्जाची विक्री झाली होती. दोन्ही दिवस मिळून १३९५ अर्ज विक्री झाले आहेत. दुसरीकडे निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ‘कर थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी…
किन्ही गावाजवळ हृदयद्रावक घटना; एक मजूर गंभीर जखमी वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर परिसरात राहणाऱ्या एका मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. खडी-कच आणण्यासाठी जात असताना किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलथल्याने बाप आणि चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिध्देश्वर नगर येथील रहिवासी आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे संजय श्रावण साबळे (वय ४८) हे सकाळच्या सुमारास अक्षय संतोष मोरे (वय २७) यांच्यासह ट्रॅक्टरने खडी-कच घेण्यासाठी तालुक्यातील किन्ही गावाकडे निघाले होते. यावेळी संजय साबळे यांनी आपला सात वर्षांचा मुलगा…

