अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ – भुसावळजवळील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी राज्यभरातून अंदाजे आठ ते दहा लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने भुसावळ शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी (4 मार्च) प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शिवपुराण कथेच्या अनुषंगाने आज किंवा उद्यापासून शहरातील…
Author: Nilesh Ajmera
उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत यावल प्रतिनिधी : जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत देखभाल दुरुस्ती कामांची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षापासून करण्यात आली आहे.कार्यक्षेत्रातील अनेक उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने कार्यकारी अभियंता यांचे टक्केवारीमुळे,अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून तसेच तक्रारदारांमध्ये आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे की २८ मे २०२५ रोजी तसेच २२ जानेवारी २०२६ रोजी तक्रार अर्ज दिले आहेत त्यात नमूद करण्यात आले आहे की तापी…
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ येथील एका विवाह सोहळ्यातून नववधूचे दागिने असलेली पर्स लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये फिर्यादी उज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. या वेळी नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान सोफ्यावर ठेवलेली ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड, मुक्ताईनगर रस्ता तसेच गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. वरणगाव प्रतिनिधी : वरणगाव ता भुसावळ शहरात अनेक दिवसा पासून वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर अखेर नगरपरिषद प्रशासनाने मोठी कारवाई करत आज (दि.५, गुरुवार) तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड, मुक्ताईनगर रस्ता तसेच गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईदरम्यान अनेक ठेले, टपऱ्या, शेड, फलक (बोर्ड) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. वरणगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या आणि रस्त्यावरच…
सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे. जळगाव शहरापासून नजीक असलेल्या तरसोद फाट्याजवळ असलेल्या ‘हॉटेल सावन’ला काल सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरसोद फाट्याजवळील हॉटेल सावनमध्ये सध्या नूतनीकरणाचे (पीओपी) काम सुरू होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आगीने रौद्र रूप धारण केले. हॉटेलचे छत पूर्णपणे ‘पीओपी’चे असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण हॉटेलला वेढले. धुराचे लोट लांबूनच दिसत असल्याने परिसरात…
कडधान्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव । हंगाम २०२५-२०२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यात तूर व हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तेलबिया व कडधान्य खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांची राज्य नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात तूर पिकासाठी दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय आधारभूत खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र तूरीचा सध्याचा बाजारभाव व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाफेड व एनसीसीएफ यांच्या विनंतीनुसार…
लिफ्ट देतो म्हणत कारमध्ये बसवले आणि लुटले ! कारचालक पोलिंसाच्या जाळ्यात जळगाव । जळगाव शहरात एकीकडे घरफोडी, वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यात जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच दरम्यान लिफ्ट देण्याच्या बहाणा करून एका ५२ वर्षीय व्यक्तीची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सलमान खान अमानउल्ला खान हे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अजिंठा चौफुली परिसरात रावेरला जाण्यासाठी उभे होते. त्यावेळी एका कारचालकाने १०० रुपये देण्याच्या मोबदल्यात रावेरला सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार…
अमेरिका- इस्रायलचे इराण सोबत युद्ध सुरू होऊन चौथा दिवस आहे. अमेरिका- इस्रायलचे इराण सोबत युद्ध सुरू होऊन चौथा दिवस आहे. युद्ध अमेरिका- इस्रायल व इराण मध्ये होत असले तरी त्याचे जागतिक परिणाम दिसू लागले आहेत. भारताला कच्चेतेल पुरविणाऱ्या इराणकडून सध्या पुरवठा होत नाही. एक महिना पुरेल इतकेच तेल भारतात आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. आत्ताच पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. या युद्धामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होतो आहे. अनेक विदेशात जाणारी विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. काही भारतीय नागरिक दुबईत विमानतळावर अडकली होती. त्यांना भारतात सुखरूप आणण्यात यश आले आहे. अमेरीका युद्धात उतरल्यामुळे अमेरिकन व्यापाराचा भारतावर परिणाम…
अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आल आहे. अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आल आहे. शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनी गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ नराधाम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित विद्यार्थिनी घारगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ती नेहमी मानसिकदृष्ट्या खचलेली आणि एकटी असायची. तिचे वडील कामासाठी बाहेर असायचे. तर तिचा भाऊ कॉलेजला जातो. तर आई कामात व्यग्र…
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास! जळगाव – शहरातील आशाबाबानगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका हॉटेल मॅनेजरच्या घरात शिरून सोन्याचे दागिने आणि घराबाहेर उभी केलेली दुचाकी, असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गोपाळ दिनकर चौधरी वय ५१ रा. आशाबाबा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हॉटेल मॅनेजर म्हणून ते नोकरीला आहे. ३ मार्च रोजी रात्री १२:३० ते पहाटे २ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात आरोपीने…

