अमळनेर पोलिसांना एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. जळगाव – शहरात गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनावरून बुधवारी (४ मार्च) पहाटे मोठा राडा झाला. जळगावमधील मास्टर कॉलनी परिसरात झालेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी झालेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर पोलिसांना एका वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या वाहनाचा अमळनेरपासून जळगावपर्यंत फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग केला. हे वाहन पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात पोहोचले असता, स्थानिक काही…
Author: Nilesh Ajmera
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव – शहरातील दादावाडी परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान, सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा…
अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत सादर करण्यात आला आहे.सदरच्या सभेत दिड तास चर्चा चालली भुसावळ प्रतिनिधी : नाशिक विभागातील एकमेव अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ नगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे ३७२ कोटी ३५ लाख ९४ हजार ६१४ रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत सादर करण्यात आला आहे.सदरच्या सभेत दिड तास चर्चा चालली .विशेष म्हणजे कोणतीही करवाढ न करता ३५ लाख ५८ हजार ४६१ रुपयांचा शिलकी अंदाज दर्शविणारा हा अर्थसंकल्प प्रशासनाने सविस्तरपणे मांडला. सभेच्या अध्यक्षस्थानी लोक नियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले व लेखापाल अय्युब तडवी उपस्थित होते.यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तसेच भाजप, शिंदेसेना…
मेहरूणमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी गालबोट लागले आहे. साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. यात घराच्या गेटची तोडफोडही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. घटनास्थळी पोलिसांचा…
अमेरीका आणि इराण यांच्या युद्धाकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अमेरीका आणि इराण यांच्या युद्धाकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून आहे. कारण, या युद्धाचे परिणाम हळूहळू संपुर्ण जगावर दिसू लागले आहे. या युद्धाचा फटका अप्रत्यक्षरिता आता जळगाव जिल्ह्याला बसू लागला आहे. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या युद्धामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली असून केळीची निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. केळी निर्यात रखडली जळगाव जिल्हा केळी उत्पदनाबाबत जगात प्रसिद्ध आहे. जळगावच्या केळीला जगभरातून मागणी असते. त्यात सध्या रमजान महिना सुरु असल्याने केळीला मोठी मागणी आहे. मात्र, अमेरीका-इराण युद्धामुळे…
डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी ! होळीच्या उत्सवात रंगलेले वातावरण एका क्षणात भीषण अपघाताने दणाणून गेले. पुण्यातील कोरेगाव पार्क–मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे आयोजित होळी सेलिब्रेशन कार्यक्रमादरम्यान लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त रॉयल फॉर्म येथे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी जमले होते. डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत सर्वजण नाचत असताना अचानक स्टेजजवळ उभारण्यात आलेला लाईटचा लोखंडी गर्डर कोसळला. हा गर्डर थेट नाचत असलेल्या तरुणांच्या अंगावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. अपघातात सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ४…
सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावल प्रतिनिधी : शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या मैदानावर रविवारी मोठ्या उत्साहात स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचा अंतिम सामना यावल शहरातील केसरीनंदन क्रिकेट टीम व राजमुद्रा क्रिकेट टीम यांच्यात रंगला.राजमुद्रा क्रिकेट संघाने हा अंतिम सामना २७ धावांनी जिंकला.हा अंतिम सामना रविवारी संध्याकाळ पर्यंत रंगला होता.सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. यावल शहरातील बस स्थानकाजवळी मैदानावर स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील संपूर्ण सामने हे चुरशीचे ठरले होते तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यावल शहरातील राजमुद्रा क्रिकेट टीम व केसरी नंदन क्रिकेट टीम हे दाखल झाले…
पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. जळगाव – वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेसह तुझ्या पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७, याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्यचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी संशयित दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी गेला होता. त्याने पीडित मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेला तिच्यासह तिच्या वडीलांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.…
प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते. भुसावळ प्रतिनिधी भुसावळ नगरपरिषद च्या सभे मध्ये मा. सभापती शोभा ताई इंगळे यांनी पोलीस वसाहत मधील अपुऱ्या सुविधा व पोलीस बांधव व त्यांचा परिवार सहन करत असलेल्या यातना यांना वाचा फोडली व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते. पोलीस बंधु सर्व नागरिकांचे सण उत्सव इमानदारीने बंदोबस्त राखून स्वतः परिवारा पासून लांब राहून नागरिकांचे उत्सव सुखरूप पणे पार पडतात नगरपालिकेचा कर भारतात मग त्यांना नागरी सुविधा का नकोएक लाईट सुद्धा चालू नाही आहे ही शोकांतिका…
शिवभक्तांनी रविवारच्या रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, भुसावळ प्रतिनिधी : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील बस स्थानकावर शिवभक्तांनी रविवारच्या रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याजवळ ठिया मारून विरोध करत पोलिसांना हटविण्यापासून रोखले, तर मंत्री . संजय सावकारे यांच्या सूचनेने १-२ महिन्यात परवानगी घेऊन नवीन पंचधातूचा पुतळा बसवण्याचे आश्वासन मिळाले. घटनेची माहिती अशी की कुऱ्हे (पानाचे) हे भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मराठा बहुल गाव असून, लोकसंख्येनुसार तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकावर शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी आणि चबुतऱ्याचे बांधकाम झाले असले तरी दुर्लक्ष होत होते. रविवारी रात्री शिवभक्तांनी अचानक पुतळा स्थापन…

