Author: Nilesh Ajmera

एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली. रावेर प्रतिनिधी : पाल ता रावेर सातपुड्याच्या कुशीत वसलेले रावेर तालुक्यातील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धामात सालाबादाप्रमाणे यंदाही दि 2 मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा होळी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली. या महोत्सवात सकाळी अकरा वाजेला अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे पचरंगी ध्वजचे अनावरण…

Read More

आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती MahaLive News | जळगाव : जळगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या भिकामचंद जैन नगर व वाघुळदे नगर परिसरात रस्ता कॉंक्रेतीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, विकासाच्या दिशेने एक ठोस व महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.या विकासकामासाठी सागर जिजाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सदर कामास मंजुरी मिळाली, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाचे उद्घाटन जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उद्घाटनप्रसंगी नवनियुक्त महापौर दिपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आलेले नगरसेवक कविता…

Read More

सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम जळगाव । धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात. नाल्यातील गाळ हा काळ्या आईचं सोनं असून तो शेतात गेला तर जमिनीची सुपीकता वाढते. या कामासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी असून सर्वांनी…

Read More

युद्धाचे परिणाम : महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अडकून इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने पुणे, विदर्भ आणि शहापूरमधील प्रवाशांची चिंता वाढली असून भारत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील नागरिक परदेशात अडकले आहेत. पुणे, विदर्भ, शहापूर अशा अनेक भागांतील नागरिक अडकले असून स्वदेशी परतण्यासाठी भारताकडे मदतीची मागणी…

Read More

चोपडा तालुक्यातील प्रेमीने स्वतःलाही संपविले : अकुलखेडा गावातील घटना चोपडा तालुक्यातील अकुल खेडे येथे प्रेम प्रकरणातून प्रियेसीवर गावठी पिस्तूलातून गोळी झाडून हत्या करून स्वतःला गोळी मारून जीवनयात्रा संपवल्याची थरारक घटना घडली. शाळेतून परत आलेल्या मुलीला दोघं ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड आक्रोश करीत बाहेर पडल्यानंतर घटनेची माहिती समोर आली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर नामक व्यक्ती रक्तबंबाड अवस्थेत त्याच्या घरात आढळून आले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास जगदीश काशिनाथ पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोघे मृतदेह पाहून…

Read More

भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत. भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत. मीटर ऑनलाइन झाल्याने बिल न भरल्यास वीजखंडित होतेय, तर बिल भरूनही काहींची वीज गुल झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला . विज आवश्यक आहे परंतु विजेचा लंपडाव सुरूच असल्याने संताप वाढला आहे. काल तापी नगर परिसरात अशा अनेक तक्रारी समोर आल्या.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेत अडचणी येत आहेत. बिल भरले तरी सिस्टम अपडेट न होताच वीज बंद पडते. सिस्टीम वर बिल भरल्या बरोबर लाईट सुरू व्हायला पाहीजे तर बिल…

Read More

प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ येथील रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको शेड मध्ये होली के रंग महिलाओ के संग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहूणे म्हणून बियाणी एज्यूकेशन गृपच्या सेक्रेटरी डॉ.संगिता बियाणी,इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य अभियंता चाणक्य जैन व त्यांच्या पत्नी प्रियंका जैन उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रियंका जैन यांनी शेड मधील महिलांसाठी प्रथमच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी रेल्वे कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले. प्रसंगी महिलांनी आपले कला गुण सादर केले. गुणवंत रेल्वे कर्मचारी…

Read More

फैजपूरला आजपासून भरणार खंडोबाची भव्य यात्रा : प्रशासन सज्ज, हजारोंच्या संख्येने येणार भाविक भक्त प्रा. उमाकांत पाटील फैजपूर प्रतिनिधी : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत प्रतिजेजुरी खंडोबाराया यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवासप्रारंभ झाला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशव इतर विविध राज्यांतून व्यापारी व भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरवर्षी लाखो भाविक यायात्रेस उपस्थित राहत असून कर्णछेदनासारखे धार्मिक विधीही येथे मोठ्या प्रमाणावर पार पडतात. सुमारे २००वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या खंडोबा देवस्थानातील मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती इंदूरचे होळकर सरकार यांचीदेणगी असल्याचे सांगितले जाते. मूर्ती न्हावी गावाकडे नेत असताना बैलगाडी अचानक थांबली व पुढे सरकलीनाही.…

Read More

अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील ! जळगाव – राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना डिसेंबर पासून केंद्र सरकारच्या हिस्साचे मानधन प्रलंबित आहे.योजनाबाह्य(उदा. लाडकी बहीण योजनेची केवायसी,एकल महिला व बालक सर्वे)कामांमुळे आधीच त्रस्त झालेल्या सेविका मदतनीस आता मानधनमुळे त्रस्त झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना तेरा हजार पाचशे आणि मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून मानधन अदा केले जाते.सदरचे मानधन आयुक्त,कार्यालय बेलापूर,नवी मुंबई यांच्या मार्फत थेट बँक खात्यात वर्ग केले जाते.एकूण मानधनपैकी केंद्र सरकार सेविकांना साडे चार हजार तर मदतनीसांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन देते.सदरचे मानधन…

Read More

शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला . भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील सुनसगाव येथील शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला . त्यामुळे चार महिला जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की १ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील शेतकरी एकनाथ गोविंदा भोळे यांच्या गोजोरा रस्त्यावर असलेल्या गावानजिक च्या शेतात चारुलता एकनाथ भोळे व सोबत गावातील महिला अनिता सतिश पाटील , रंजना रोहिदास पाटील तसेच एक आदिवासी पावरा महिला अशा चौघी महीला हरभरा पिकाची कापणी करीत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे या महिलांनी वाचवा वाचवा म्हणत गावाकडे…

Read More