Author: Nilesh Ajmera

चाळीसगावमध्ये शिवजयंतीत वाद; एपीआयची तडकाफडकी बदली जळगाव । चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या झालेल्या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या मार्गावर वाहन उभे करण्याच्या मुद्द्यावरून शिवप्रेमी आणि एपीआय भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात…

Read More

दिव्यांग योजनेतील भ्रष्टाचार,किती खरा किती खोटा ! महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची भूमी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून समानतेचा सामाजिक न्यायाचा आणि मानवी सन्मानाचा विचार समाज मनात खोलवर रुजला. या परंपरेतून वंचित उपेक्षित घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याची योजनांमधून राज्याची बांधिलकी निर्माण झाली. दिव्यांग व्यक्तींच्या योजना ही त्याच बांधिलकीची फलश्रुती होय. परंतु या योजनेतील अंमलबजावणीतील घोटाळे अधून मधून डोके वर काढत आहेत. त्यामुळे प्रश्न उभा राहिला दिव्यांग कल्याण आतील भ्रष्टाचार किती खरा किती खोटा केवळ आरोपाच्या पत्रावळीवर दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी अनुदान, कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे, प्रवास सवलती, आरक्षण, निवास योजना, आरोग्य विषयक सहाय्य…

Read More

दोन आठवड्यात तिसरी घटना उघडकीस यावल : येथील विरार नगरातील रहिवासी शेख साबीर शेख प्यारे साहब कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूपे तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयाच्या रोकड सह ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोने घरातील कपाटातून चोरून नेले. ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी चे रात्री दहा वाजेचे दरम्यान घडली. मागील १५ दिवसात याच परिसरातील चोरी ही तिसरी घटना असून याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी दिल्यावरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेले वृत्त असे की, येथील बुरुज चौकात बऱ्हाणपूर जिलेबीवाला म्हणून व्यवसाय करणारे…

Read More

अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियान “भूमी स्वस्थ राहिली तर समाज स्वस्थ राहील” या भावनेतून तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर मेळ साधत शेती – मातीसोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षय कृषी परिवाराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण एवं संरक्षण अभियानाचा’ शुभारंभ 19 मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात देशाचे कृषी मंत्री तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने शेती, माती आणि जीवन यावर परिवर्तनात्मक संवाद होणार असून हे अभियान एक व्यापक चळवळ बनावे, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या…

Read More

विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. भुसावळ प्रतिनिधी : येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी चाणक्य जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार व त्यांच्या शौर्या बद्दल विचार व्यक्त केले.त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी सैन्य, कमी शस्त्र असून सुद्धा युक्तीचा वापर करून स्वराज निर्माण केले त्या प्रमाणे आपल्याला सुद्धा रेल्वे ला पुढे घेऊन जायचे आहे. या वेळी ललित भारंबे,निलेश इंगळे,सुशील पगारे,राजीव कुमार सिंग,जयेश ढाकणे,राहुल राजपूत,ललित मुथा,योगेश…

Read More

कार्यालयात बोलावून जबरदस्ती केल्याचा आरोप; फॉरेन्सिक तपासणीसह पोलिसांचा तपास गतीने भुसावळ प्रतिनिधी : शहरातील एका २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने कार्यालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी राजू गायकवाड याला तातडीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टपाल विभागात कार्यरत असून ती भुसावळ येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कामाच्या निमित्ताने तिची आरोपीशी पूर्वीपासून ओळख होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने तिला…

Read More

राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला भुसावळ प्रतिनिधी : 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेने च्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली सर्वप्रथम श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्या नन्तर आपल्या सम्भाषणात दामोदर राजपूत यांनी घराघरात शिवाजी राजे घडवा या विषयावर सम्भाषण केले तसेच जिल्हा अध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनी आपल्या भाषणात प्रत्येक आई ने आपल्या पोटी आलेल्या मुलाला शिवबा सारखे संस्कार द्यावेत या विषयावर भाष्य केले नन्तर सर्व पदाधिकाऱ्यांनी वदंन केले. या प्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिकाताई…

Read More

भव्य चित्रकला व किल्ले बनविण्याच्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य चित्रकला व किल्ले बनविण्याच्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने परिसरात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्य स्थापना, देशभक्ती, किल्ले व विविध ऐतिहासिक प्रसंग या विषयांवर कल्पकतेने चित्रे रेखाटली. चित्रकला स्पर्धेत एकूण ९८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये गट क्र. १ (इ. १ली ते ५वी)…

Read More

आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ जळगाव । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन अनेक गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. यातच आता भुसावळ जळगाव मार्गे धावणाऱ्या बडनेरा ते नाशिक रोड अनारक्षित गाडीसह साईनगर शिर्डी-बिकानेर आणि मुंबई–रिवा या साप्ताहिक गाडीच्या सेवेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बडनेरा–नाशिक रोड-बडनेरा मेमू मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा–नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू गाडी यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही गाडी ०१ मार्च ते १५ जुलै २०२६ या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे,…

Read More

रिंग रोडच्या कामादरम्यान दुर्दैवी घटनेचा थरार डंपर घरावर पलटल्याने घरातील दोन महिलांचा मृत्यू झाला असल्याची भीषण दुर्घटना पुण्यातील मुळशीत रिंग रोड कामादरम्यान घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे भरपाईची मागणी केली आहे. मिळालेली माहितीनुसार, मुळशी तालुक्यात रिंग रोडचे रस्त्याच्या भरावाचे काम सुरू होते. यादरम्यान डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट एका घरावर पलटला. या भीषण अपघातात घरात असलेल्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून…

Read More