Author: Nilesh Ajmera

‘जय गजानन’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला जळगाव प्रतिनिधी : शेगावचे श्री गजानन महाराज हे दत्तसंप्रदायातील महान संत व योगी म्हणून ओळखले जातात. सेवाभाव, भक्तिमार्ग आणि साधेपणाचा संदेश देणाऱ्या या अवलिया संतांचा प्रकटदिन काल (दि. ८ फेब्रुवारी) जळगाव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. “गण गण गणात बोते” हा मंत्र जगाला देत कोणतेही अवडंबर न करता भक्तीनेच ईश्वरप्राप्ती शक्य आहे, हे श्री गजानन महाराजांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील सप्तशृंगी कॉलनीतील सप्तशृंगी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर सप्तशृंगी माता महिला भजनी मंडळाच्या वतीने…

Read More

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव – शहरातील गजबजलेल्या आयएमआर कॉलेज जवळील रामबाग कॉलनी परिसरातून ८ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. प्लॉट नं ५, रामबाग कॉलनी, जळगाव) हे सेवानिवृत्त असून आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली टाटा नेक्सॉन कार (क्रमांक MH-19 DV-7790) घरासमोरील सार्वजनिक रोडवर नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जेव्हा…

Read More

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश ! जळगाव | प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केले आहे की, ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत…

Read More

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याला नवी दिशा देणारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, दि.५ फेब्रुवारी रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती…

Read More

बाळंतपणात आईचा अंत; बाळ मात्र सुखरूप वरणगाव : शहरातील मकरंदनगर मधील रहिवाशी दिनकर हरी सोनवणे (सेवा निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी) यांच्या लहान सुनबाई स्वाती सोनवणे (वय २८ ) यांची ७ फेब्रुवारी शनिवार रोजी मुंबई येथील केईएम रुग्णालयात प्रसूती झाली. दरम्यान झालेल्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे सकाळच्या सुमारास निधन झाले ; परंतु बाळ मात्र सुरक्षित आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय दिनकरराव सोनवणे यांचा दोन वर्षापुर्वी केकत निंभोरा येथिल स्वाती सोनवणे यांचेशी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला होता. त्यांच्या संसार वेलीवर एक फुलसुद्धा उमलले परंतु नियतीला ते पहावले नाही. त्यांचा बाळंतपणाचा कार्यकाल पुर्ण होणे आधी सातव्या महिन्यात त्यांचेवर जळगाव येथील दवाखान्यात सिझेरियन झाल्यावर रक्तस्त्राव थांबत…

Read More

बारावीच्या परीक्षेसाठी चुंचाळेत नवीन केंद्र यावल तालुक्यातील आठ परिक्षा केंद्रात मंगळवारपासून (दि. १०) बारावीची परिक्षा सुरू होणार आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला मराठी व उर्दू माध्यमाचे ३ हजार ८३ विद्यार्थी प्रविष्ट असतील. सर्व परिक्षा केंद्रात बैठे पथक तैनात असेल. तसेच भोंगळ कारभार रोखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना एक तास अगोदर परिक्षा केंद्रात उपस्थित रहावे लागेल. यावल व फैजपूर शहरात प्रत्येकी दोन परिक्षा केंद्र असून ग्रामीण भागात चार असे तालुक्यात ८ केंद्र आहे. यंदा चुंचाळे येथे एक नवीन केंद्र केले असून यावल येथे एक परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहे. यावल तालुक्यातील ८ परिक्षा केंद्रासाठी दोन कस्टडी आहे. परीक्षा केंद्र…

Read More

दुसखेड्याचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील संगिता विशाल दांडगे तथा फैजपूर पोलिसांचे आभार मानले. फैजपूर प्रतिनिधी : दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची ५५,००० रू. किंमतीची १२.५ हॉर्सपॉवरची मोटर १ फेब्रुवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी चोरून नेली होती.२ तारखेच्या सकाळी राजेंद्र पाटील हे नदी वरती मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोटर आढळून आली नाही व वायर कट झालेली दिसली. तात्काळ त्यांनी पोलीस पाटील संगिता विशाल दांडगे यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी लगेचच फैजपूर पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले. राजेंद्र पाटील यांना फिर्याद देण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे तात्काळ पाठवण्यात आले. फिर्याद देऊन साधारण ४ ते ५ दिवस…

Read More

जुगार अड्ड्यावर छापा! १३ जणांवर गुन्हा दाखल; ७,११० रुपये जप्त चाळीसगाव – ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने शिंदी गावातील बाजार पट्टीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ७ हजार ११० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत शिंदी गावातील बाजार पट्टीजवळील मोकळ्या जागेत काही इसम पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पंचनामा करून शासकीय वाहनाने पोलीस पथकाने छापा टाकला.छाप्यात रामेश्वर रामदास राठोड (३०), संदिप शिवनाथ…

Read More

भुसावळात कारवाईचा धसका : दामिनी पथकाकडून महाविद्यालयाच्या आवारात गस्त भुसावळ : शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढल्याने बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अशा रोडरोमिओंविरोधात कारवाईसाठी दामिनी पथकाला निर्देश दिले आहेत. शहरातील बाजारपेठ हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या आवारात या पथकाकडून आता गस्त घालून रोडरोमिओंवर कारवाई केली जाणार आहे. पथक सक्रिय होताच रोडरोमिओ गायब झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांभोवती रोडरोमिओंचा डेराशहरातील शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत अनेक नामांकित शाळा-महाविद्यालये आहेत तर शहरासह तालुकास्तरावरून अनेक विद्यार्थिनी ज्ञानाजर्नासाठी शहरात येतात मात्र शाळा व क्लास सुटल्यांनंतर मुलींची छेड काढण्यात येत असल्याची तक्रारी पाहता बाजारपेठ पोलिसांनी दामिनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले आहेत. टारगटांची…

Read More

हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये अधिक दर मिळत आहे. जळगाव प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून गुलाबी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ५ फेब्रुवारी रोजीच्या बाजारभावानुसार गुलाबी हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये अधिक दर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे चाफा हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून तुरीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, खासगी बाजारात गुलाबी हरभऱ्याला सध्या ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत…

Read More