Author: Nilesh Ajmera

लग्नासाठी अडीच लाखात फसवणूक : सात ताब्यात! रोकड हस्तगत : यावल तालुक्यातील मालोद येथील एका ३५ वर्षीय तरुणास विवाह करिता मुलगी देतो असे सांगत एका विवाहितेलाच नववधू आणि तिचे खोटे नातेवाईक उभे करून तरूणाचे लग्न लावले होते. या पोटी त्यांच्या कडून २ लाख ५४ हजार रुपये उकळले होते. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मावस भाऊचा अपघात झाला असा बनाव करून पसार होण्याच्या बेतात नववधूचे वागणे संशयास्पद वाटले व सदर बिंग फुटले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास लावत सर्व सात संशयीतांना ताब्यात घेतले व त्यांच्या कडून १ लाख ७०…

Read More

पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा : सचिवपदी जंजाळे तर मुख्य संघटकपदी संदानशिव विश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन जळगाव : विश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत संघटन बळकट करण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या. ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेली ही बैठक राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.…

Read More

पारोळयात गावठी कट्ट्यासह एकास अटक पारोळा : पारोळा तालुक्यातील शवेगे बुद्रुक फाट्यावर गावठी कट्ट्यासह एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील शेवगे बुद्रुक परिसरात रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून काही शस्त्र जाणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिस स्टेशनला मिळाल्याने पोलीसांनी सापळा रचला व गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोघांपैकी एकास पारोळा पोलिसांनी जेरबंद केले तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. याबाबत पारोळा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना दि ४ फेब्रुवारी रोजी रात्री बहादरपूर-पारोळा रस्त्यावर शस्त्रधारी व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ५ रोजी रात्री सुमारे दीड वाजता शेवगे बुद्रुक येथील वळणाजवळ एमएच १९ सि वाय २५७५…

Read More

आधुनिक नैतिक संकटांवर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रकाश; जळगाव प्रतिनिधी । आजच्या तंत्रज्ञानप्रधान आणि वेगवान जीवनशैलीत मानवासमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक आव्हानांवर भारतीय तत्त्वज्ञान प्रभावी उत्तर देऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत अलाहाबाद विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. ऋषीकांत पांडे यांनी भारतीय विचारपरंपरेची समकालीन उपयुक्तता अधोरेखित केली. आधुनिक समाजातील नैतिक संभ्रम, मूल्यांची गळती आणि मानवी नात्यांतील ताण यावर भारतीय दर्शनांतील नीतिशास्त्र आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि समकालीन नैतिक आव्हाने’ या विषयावर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय तत्त्वज्ञान…

Read More

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला जळगाव प्रतिनिधी । अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप व आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती सरकारने कामगार व कर्मचारी हिताचे कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू केल्या असून, या संहिता कामगारविरोधी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या श्रम संहिता रद्द कराव्यात तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या…

Read More

किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या ; नातेवाईकांचा आक्रोश जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. अवघ्या २१ वर्षांच्या शुभम गजानन सपकाळे या तरुणाला चौघांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या शुभमचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंप्राळा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. मयत शुभम सपकाळे (रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) हा प्रशांत पाटील चौकात असताना संशयित आरोपी विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा शांताराम कोळी, यश प्रदीप पाटील…

Read More

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; कार्यकर्त्यांचा जल्लोष ! जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ४६, शिवसेनेला २२, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेना (उबाठा) गटाला ५ जागा मिळाल्या होत्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न…

Read More

शाळांना सुट्टी, सरकारी ऑफिससह दारू दुकाने राहणार बंद! राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मतदान होणाऱ्या १२ जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूची दुकानेही बंद राहणार आहे. याचे  मोठे कारण म्हणजे पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा आज थांबणार आहे. शनिवारी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळेच हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी असेल. त्याचसाठी शनिवारी १२ जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना…

Read More

मराठीचा अवमान खपवून घेणार नाही : मनविसेचा इशारा जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात मनविसेने आवाज उठविला आहे. विद्यापीठ प्रशासनाने अलीकडेच प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे अध्यादेश आणि परिपत्रके केवळ इंग्रजी भाषेत काढल्याने मनविसेने तीव्र संताप व्यक्त केला असून, हा थेट मराठी भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाने ७ जानेवारी रोजी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, हे दोन्ही दस्तऐवज पूर्णपणे इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते समजणे कठीण झाले आहे. यासंदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. “महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असताना आणि उत्तर…

Read More

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नवोदय विद्यालयास भेट जळगाव | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन विद्यालय परिसर व विविध विभागांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. या भेटीदरम्यान शैक्षणिक सुविधा व अध्यापन व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, क्रीडा साहित्य व क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा व वाचनालयाची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व दैनंदिन व्यवस्थेची स्थिती यांची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी व…

Read More