Author: Nilesh Ajmera

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा निर्घृण खून असल्याचे स्पष्ट होत असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगल परिसरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला असून, त्यामुळे तिची ओळख…

Read More

संतांनी सांगितलेले सूत्र आत्मसात केले तरच गुरुंची कृपा‌ही आपोआप होत असते. जामनेर : पुरुषार्थ असेल तरच गुरुंची कृपा प्राप्त होते असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. चैतन्य धाम जामनेर येथील राधामाधव मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते. जीवन क्षणभगूर आहे ते पुरुषार्थ करून, सन्मार्गाने जगता आले पाहिजे. जिनकी मृत्यू होती हैं उनकी कोई प्रॉपर्टी नहीं गाडीचा विमा असला तरच नवीन गाडी मिळेल, पण शरीर एकदा गेलं तर पुन्हा नाही मिळत म्हणूनच भगवंत प्रेमात लिन व्हा, निर्व्यसनी रहा आणि सर्वांना सहकार्य करा. योग्यता असेल तर गुरूंची कृपा ही आपोआप होते. जसे श्याम चैतन्यजी यांच्यावर असलेला गुरूंचा आशीर्वाद…

Read More

शेअर मार्केटच्या आमिषातून तरुणीची १० लाखांची फसवणूक; भुसावळ शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणुकीसह लग्नासाठी दबाव, पाठलाग, घरात घुसून चाकूचा धाक दाखवत विनयभंग, तसेच अश्लील फोटो मॉर्फ करून बदनामीची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धान्त मनोज हेडा याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी सिद्धान्त मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याने पीडित तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत…

Read More

पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी भुसावळ प्रतिनिधी : शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी, तर्फे आयोजित ‘एसपीएल सीजन -२ ला बुधवारी सुरुवात झाली झाली. पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा व पूर्वा संघाने सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार नीता लबडे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, गटविकास अधिकारी दारासिंग जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांच्या उपस्थितीत एसपीएल ची प्रतिकृती हवेत सोडून व चेंडू टोलवून करण्यात आली. याप्रसंगी गावातील सत्ताधारी व विरोधी सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेट प्रक्षेपण होणाऱ्या साकेगाव प्रीमियर लीग…

Read More

भुसावळ पालिकेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने वाद विवादान विषय मंजूर भुसावळ : नगरपालिकेत सत्तांतरण झाल्यानंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झालेल्या या सभेत ‘लाडका नगरसेवक योजना’ सुरू केल्याचा आरोप झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाले. अखेरीस सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील तब्बल २५० विषयांना मंजुरी दिल्याची घोषणा केली. सभेच्या अजेंड्यातील २५० पैकी शंभरहून अधिक विषयांना भाजपा विरोधकांनी विरोध दर्शविला. या संदर्भात नगराध्यक्षांना लेखी विरोधपत्रही सादर करण्यात आले. विशेषतः विषय क्रमांक २८ ते ६९ हे सर्व विषय एकाच प्रभाग क्रमांक दोनशी संबंधित असल्याने भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी…

Read More

पोलिसांनी कोरपावली येथील त्यांच्या घरून त्यांना अटक केली. रावेर शहरातील दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी कोरपावली येथून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना रावेर शहरातील चक्क ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गौरव दत्तात्रय तायडे (२०), तौसिफ तैय्यब आणि अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (तिन्ही रा. कोरपावली, ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातील सराफा व्यावसायिकांची दुचाकी रावेर शहरातील स्वामी नारायण मंदिरजवळून चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी ही चोरीची दुचाकी शिरपूर येथे…

Read More

स्पेनमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली रवाना यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी दिशा विजय पाटील या बॉक्सर गर्लची भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. स्पेन येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती रवाना देखील झाली. 57 ते 60 किलो वजन गटात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या निवडीबद्दल व स्पेनमध्ये ती भारताचे करत असलेल्या प्रतिनिधित्व बद्दल तिला शुभेच्छा दिल्या जात आहे. किनगाव, ता.यावल येथील रहिवाशी तथा महाराष्ट्र बॉक्सर संघाची खेळाडू दिशा विजय पाटील हिची नुकतेच भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. पटियाला येथे तिचा गेल्या काही दिवसांपासुन सराव कॅम्पमध्ये सराव सुरू होता. पटियाला येथे सराव पार पडल्यानंतर ती स्पेन…

Read More

दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले. जळगाव प्रतिनिधी :- शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांची महापौर पदी निवड निश्चित झाली आहे. महायुतीच्या वतीने त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी दीपमाला काळे यांनी जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांसह जळगाव ते पद्मालय असा सायकल प्रवास करत गणरायाचे दर्शन घेतले. दीपमाला काळे यांना सायकलिंगची प्रचंड आवड असून त्या आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असतात. महापौर पदाची मोठी जबाबदारी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन अमळनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन व अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. अजितदादा यांचे अस्थी कलश दुपारी ३ ते ४ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर अस्थिकलशाची रथयात्रा अमळनेर–धार–मारवड–कळमसरे–पाडळसरे मार्गे काढण्यात आली. या रथयात्रेदरम्यान मार्गावरील गावांमध्ये नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण दिसून येत होते. पाडळसरे…

Read More

काव्यरत्नावली चौकात ठगांचा थरार; जळगाव | बारदान खरेदीसाठी ५०० रुपयांच्या चलन नोटांची गरज असल्याचे भासवून अस्सल नोटा घेऊन त्याऐवजी मुलांच्या खेळण्यातील नोटा देत तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काव्यरत्नावली चौक परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारदान विक्रेते प्रकाश श्रीराम प्रजापत (वय ५०, रा. प्रजापत नगर) यांना काही दिवसांपूर्वी रवींद्र तायडे नामक व्यक्तीने फोन करून दोन लाख बारदान विक्रीसाठी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दि. २३ जानेवारी रोजी तायडे एका साथीदारासह प्रजापत यांच्या घरी…

Read More