अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या निधनानिमित्त अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहिली. दीपप्रज्वलनाच्या प्रकाशात संपूर्ण परिसर भावूक झाला होता. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आदर व कृतज्ञतेची भावना दिसून येत होती. स्व. अजित दादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या…
Author: Nilesh Ajmera
खोटी मालकी दाखवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात जळगाव : भूसंपादन विभाग, जळगाव यांच्या कडील भूसंपादीत जागेची मालक असल्याचे खोटे भासवून शासनाकडून तब्बल १६ लाख ९७ हजार ३२६ रुपयांचा मोबदला बँक खात्यात घेत शासनाची फसवणूक करणाऱ्या महिलेला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील (वय ५९, रा. ज्ञानेश्वर नगर, देवळाली पाथर्डी रोड, नाशिक) हिने मौजे नशिराबाद, तालुका जळगाव येथील गट क्रमांक २२०६ मधील प्लॉट क्रमांक ३ व ४ हे स्वतःचे असल्याचे भासवले. प्रत्यक्षात हे प्लॉट श्रीमती पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीचे आहेत.…
जळगावच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; जळगाव । नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत जळगावमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. यांनतर जळगाव महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असून दोन दिवसांपूर्वीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले. यात ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. मात्र अद्यापही महापौर पदाचा चेहरा जाहीर झाला नाहीय. यामुळे जळगावचा महापौर कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अशातच महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. असा असेल कार्यक्रमशासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या मंगळवार(दि २७) आणि बुधवारी(दि २८) महापौर व उपमहापौर पदाचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले जाणार आहेत. मनपा आयुक्तांनी…
पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; बांधावर जाऊन केली पाहणी जळगाव । जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा…
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजनांचे मोठं विधान; जळगाव । अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? कोण उपमुख्यमंत्रिपदाची घेणार यांची चर्चा रंगली होती. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं. काय म्हणाले गिरीश महाजन?मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा…
१ फेब्रुवारी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर होणार जळगाव । उद्या १ फेब्रुवारी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर होणार असून यातून सर्वसामान्यांना महागाईतुन दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यापूर्वी दैनंदिन वापरातील अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलांच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अवघ्या एका महिन्यातच शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो १५० वरून २१५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. साधारणपणे सण-उत्सवांच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्याने दर वाढतात. मात्र, यंदा दिवाळीत दर स्थिर होते. आता कोणताही मोठा सण नसताना तेलाचे दर भडकले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सध्याची…
शरद पवारांना डावलून निर्णय? पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंतुलन व नेतृत्वाबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेतल्याचे समोर आल्याने पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. शरद पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचे स्पष्ट केले. “सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय एवढ्या घाईने का घेण्यात आला, याची मला माहिती नाही. या संदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही,” असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी…
सकाळी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन जळगाव प्रतिनिधी । हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरात सकाळी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता खानदेश सेंट्रल बिग बाजार येथून ध्वज पूजन व शंखनाद करून रॅलीची विधिवत सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करत ही रॅली पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उत्साहात संपन्न झाली. रॅलीच्या प्रारंभी ध्वज पूजन व शंखनादाने वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रात चौक व कोर्ट चौक येथे पोहोचली असता प्रत्येक ठिकाणी ध्वज पूजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीचे जंगी स्वागत केले. रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी घोषणांच्या…
दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री ओंकारेश्वर मंदिराचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा आज ३१ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी आणि पूजन कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून जोशी परिवाराच्या हस्ते मंदिरात विधीवत धार्मिक अनुष्ठाने पार पडली. यामध्ये पुण्याहवाचन, घंटापूजन, दीपक पूजन व शंखपूजन करण्यात आले. यासोबतच गणेश-अंबिका पूजन, द्वारपूजन व वास्तुपूजन करून मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात…
श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल. जळगाव | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी आकस्मिक निधनामुळे राज्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.अजितदादा पवार यांचे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा अशा विविधांगी क्षेत्रातील काम लक्षात घेता सर्वपक्षीय आणि जिल्ह्यातील अखिल सर्वसमावेशक संस्था तसेच संघटनांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे येत्या रविवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल. आज शुक्रवार (३० जानेवारी) रोजी याबाबत पूर्वतयारीची बैठक जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात ही बैठक…

