Author: Nilesh Ajmera

शासनाने विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना अनुदान थेट जळगाव प्रतिनिधी। शासनाने विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना अनुदान थेट व ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार अंमलात आणण्यात आला आहे. अनुदानात वाढ झाल्यानंतर दरमहा २,५०० रुपये अर्थसहाय्य घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर संलग्न करणेही आवश्यक आहे. यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड तसेच बैंक पासबुकच्या छायांकित प्रती…

Read More

फिटनेससाठी नाशिक-छत्रपती संभाजीनगरची फरफट जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अद्याप ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर (AVTS) सुरू न झाल्यामुळे व्यावसायिक वाहनधारकांची मोठी कोंडी झाली असून, फिटनेस प्रमाणपत्रासाठी इतर जिल्ह्यांत जावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा ट्रक असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्ह्यात AVTS केंद्र उपलब्ध नसल्यामुळे ट्रक, बस व इतर व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी वाहनधारकांना थेट नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत आहे. या प्रक्रियेत इंधन खर्च, टोल, वाहनांची अतिरिक्त धावपळ, वेळेची नासाडी तसेच व्यवसायाचे मोठे नुकसान होत असल्याचा…

Read More

सकाळीच कर्मचाऱ्यांची झाडाझडती पारोळा प्रतिनिधी | पारोळा नगरपरिषदेत सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीचे नवनियुक्त सभापती डॉ. मंगेश तांबे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी कडक पावले उचलली. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आज सकाळी ६ वाजता आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन झाडाझडती करण्यात आली. वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षांच्या अनुमतीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरात अपेक्षित स्वरूपाची साफसफाई न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत नाराजी होती. योग्य नियोजनाअभावी निर्माण झालेल्या या स्थितीवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी शहरवासीयांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून…

Read More

15 हजाराची लाच घेताना वनपाल आणि खासगी पंटर जाळ्यात जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच रावेर तालुक्यात १५ हजाराची लाच स्वीकारताना वनपाल आणि खासगी पंटरला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी पंटर दीपक रघुनाथ तायडे अशी लाचखोरांची नावे असून याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकार काय?तक्रारदार यावल वन विभागात जिन्सी (ता. रावेर) वनक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत असताना, यावल येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील रोप वनातील निंदणीच्या कामाची तपासणी केली होती. तेव्हा वनपाल राजेंद्र सरदार याने तक्रारदाराला व्हाटसॲप कॉल करून…

Read More

नागरिकांना मोठा दिलासा जळगाव : शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. महापालिका हद्दीतील, महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास, संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाइकांना **जळगाव महानगरपालिका**कडून आर्थिक मोबदला (नुकसानभरपाई) दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक पुराव्यांसह माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी अर्ज महापालिकेच्या नवव्या मजल्यावर शहर अभियंता कार्यालयात, सर्व आवश्यक पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे रस्ते देखभालीबाबत महापालिकेची जबाबदारी अधिक वाढली असून, अपघातातील जखमी नागरिक तसेच मृतांच्या कुटुंबीयांना कायदेशीर आधार मिळाला…

Read More

या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले अमळनेर – केवळ “माझ्याकडे का पाहिले?” या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने बाप-लेकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे सोमवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,१९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी विजय बापू अहिरे (वय-२३) हे आपल्या घराच्या गच्चीवर उभे होते. यावेळी आरोपी विनायक आनंदा अहिरे याने विजयने त्याच्याकडे का पाहिले, या कारणावरून वाद उकरून…

Read More

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई जळगाव । जळगावमध्ये आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. डीवायएसपी यांच्या पथकाने जळगावच्या पिंप्राळ्यात बारीवाड्यातील एका घरात सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका केली. तर संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून रामानंदनगर पोलिसात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंप्राळा भागात एका ठिकाणी छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यावरुन बारीवाडालगत बैरागी नामक महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. त्याला खात्री करून मोबाइलवर मिस कॉल देण्यास…

Read More

उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे नेत्यांपुढे लोटांगण! जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नसल्या, तरी जिल्ह्याच्या राजकारणात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भातील मर्यादांवर दि. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणूक अधिसूचनेआधीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराची कार्यक्षमता, कामाचा अनुभव किंवा जनसंपर्कापेक्षा ‘जातीय समीकरण’ अधिक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच विविध पक्षांतील कार्यकर्ते आपापल्या जातीच्या उमेदवारासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा ही पक्षांतर्गत बैठकींपेक्षा चहाच्या…

Read More

खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ ; गृहिणींच्या बजेटला फटका जळगाव । घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. पामतेल १३२ वरून १३७, सूर्यफूल तेल १६० वरून १७२ रुपये प्रतिकिलो झाले आहे. तीळ तेल २६० रुपयांवर स्थिर आहे. साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. मात्र मागच्या काही दिवसात खाद्यतेलात वाढ झाली. काय आहे दरवाढीचे कारण?अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत…

Read More

जळगाव महापौरपदासाठी भाजप निष्ठावंतांची चर्चा महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. 29 पैकी 17 महानगरपालिकामध्ये भाजपला यश मिळाले असून जळगाव महानगरपालिकेत भाजप आणि महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. 75 नगरसेवकांपैकी 69 जागा जिंकून महायुती आघाडीवर असून त्यात 46 पैकी 46 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष आहे; त्यापाठोपाठ 22 पैकी 22 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 5 पैकी अवघ्या एका जागेवर विजय प्राप्त करता आला. पाच उबाठाचे आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर हा महायुतीचाच होणार असला तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप महापौर पदाचा दावेदार आहे. भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नगरसेवक महापौरपदाच्या…

Read More