Author: Nilesh Ajmera

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मृत्यू झाल्याची घटना एरंडोल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सावखेडा–मराठखेडा (ता. पारोळा) गावाजवळ मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत जवळपास एक ते दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून सावखेडा–मराठखेडा परिसरासह एरंडोल तालुक्यातील जळू, पातरखेडा, भालगाव, नांदगाव आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच सावखेडा–मराठखेड्याचे पोलीस पाटील संतोष पुंडलिक पाटील यांनी तात्काळ एरंडोल वनपरिक्षेत्र कार्यालयाला दूरध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपाल देविदास जाधव, वनपाल सतीश ठेलार यांच्यासह वनविभागाचे पथक सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल…

Read More

केवळ १४ जणांची नसबंदी; वर्षभरात पाच हजारांवर महिलांनी घेतला पुढाकार जळगाव : एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जात असते. यात कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये महिलाच पुढे असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात या वर्षभरात पाच हजार १९८ महिलांनी व केवळ १४ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लहान कुटूंब अर्थात एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली जात असते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी महिला व पुरुष या दोघांची सारखीच जबाबदारी असते. मात्र, काही गैरसजामुळे पुरुष या…

Read More

निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्या निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात आगी व रासायनिक आपत्तींच्या नियंत्रणासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नुकतेच विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत एमआयडीसीमधील सर्व सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अग्निशमन विभाग, तसेच जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या माध्यमातून टेबल टॉप मीटिंग, मॉकड्रील व रासायनिक आपत्ती विषयक सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११.०० ते १.०० या…

Read More

धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांची पळापळ झाली. स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोध व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी; औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी तातडीने सर्व नियमित कामे सोडून विमानतळावर हजर झाले. विमानतळ परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. संशयित वस्तू शोधण्यासाठी विशेष पथकाने सखोल तपासणी केली,…

Read More

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे युतीची घोषणा केली. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपल्या भावना आणि युतीमागची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे काय म्हणाले? यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात संयुक्त…

Read More

दोन ठाकरे पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद जळगावात उमटले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला.जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र फोटोंचे बॅनर हातात घेऊन ‘युती’च्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मनसे सैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला.उत्साह मोठा, पण ठाकरे गटाची पाठ? या जल्लोषात मनसे जिल्हाध्यक्ष…

Read More

गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ झाल्याने गुन्हेगारांचे बारा वाजणार… भुसावळ प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर २०२५ भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली.राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश काढल्याने आता भुसावळ विभागातील गुन्हेगारांचे कायदेशीर रित्या बारा वाजणार असल्याने मोठी खळबळ उडाली. कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीचे निर्देश दिले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगली माहिती आहे. शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ विभागात कायदा सुव्यवस्थेला,जातीय सलोख्याला अधिक बळकटी मिळेल,असा विश्वास भुसावळ शहरासह परिसरात व्यक्त होत…

Read More

प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यश हमखास जळगाव प्रतिनिधी : प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल त्याकरीता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनविण्‍यास सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठात दीक्षांत समारंभात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २३डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारंभात दीक्षांत भाषण करतांना प्रा. गणेशन कन्नबीरन बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.…

Read More

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा जळगाव प्रतिनिधी – ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपलख वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य सेवांमध्ये रोजगार वाढेल. त्यासाठी विविध संस्था, औद्योगक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर करुन निविष्ठामधील खर्च कसा कमी करता येईल, उत्कृष्ट रोपांची निर्मिती, यासाठी शेतीमधील आयटी तज्ज्ञ गावोगावी घडले पाहिजे यातून विकसीत भारत घडू शकतो असे मत डॉ. वसंतराव…

Read More

चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे. याच दरम्यान, अमळनेर शहरात विविध दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अंकलेश्वर येथून अटक केली आहे. प्रशांत जगन वालडे (मूळ रा. गोरगावले ता. चोपडा व हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे. शहरातील मध्यवस्तीत बाजारपेठेत नुकतीच चार ते पाच दुकाने पत्रा कापून, शेड कापून फोडण्यात आली होती. त्यातील वस्तू महागडा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेल्याने शहरात खळबळ माजली होती. या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय…

Read More