शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक. यावल प्रतिनिधी : यावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी मोठा अपघात घडला.या अपघातात इको वाहन चालकासह सुमारे १० ते १२ लहान बालके तथा शालेय विद्यार्थी जखमी झाले तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाहतूक बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एस.टी बसचे वाहक एस.एम.पाटील व चालक ए.ए.तडवी हे होते. घटनेनंतर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात आणि संबंधित पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि सर्वांनी यावल ग्रामीण रुग्णालयात लहान लहान बालकांना पाहण्यासाठी गर्दी केली सकाळी साडेसातच्या…
Author: Nilesh Ajmera
सव्वा कोटीचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर. यावल प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच २७४ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प लोकनियुक्त नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांच्या आणि यावल नगरपरिषद नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.जनतेचे हित लक्षात घेता कोणत्याही प्रकारचे कर वाढ नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.शनिवारी दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोट्यावधी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असुन या अर्थसंकल्पात कोट्यावधीच्या विविध विकास कामांचा समावेश आहे.तर हा अर्थसंकल्प तब्बल एक कोटी २९ लाख ५९ हजार ४१० रुपयाचा शिलकी असून या अर्थसंकल्पात प्रपत्र ६ जोडून सदर निधी कोणत्या कामात किती प्रमाणात खर्च होईल याची माहिती देखील सभागृहात…
नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीशी किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले आणि त्यातून संतापाच्या भरात आरोपीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र…
जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव । आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जळगावकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्च २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार असून, मात्र अर्धा लिटरच्या पाऊचला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे. संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाच्या दरात प्रति लिटर तब्बल सात रुपयांची वाढ…
मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत 2020-21 ते 2024-25 अखेर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत 2020-21 ते 2024-25 अखेर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या प्रकरणाची एक महिन्याच्या आत सखोल चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी कामांच्या मंजुरी प्रक्रियेत आढळलेल्या गंभीर त्रुटींवर सविस्तर माहिती देत सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.मंत्री…
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. जळगाव । पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती तसेच तक्रार निवारण बाबतची माहिती नागरिकांपर्यंत व्हाट्सॲपवर पाठविण्यात येणार आहे. या अत्याधुनिक चॅटबॉटचे लोकार्पण आज नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. पाचोरा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियांका पाटील, सभापती मीनाक्षी…
पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. जळगाव । चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. या मोहिमेत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अनेकवेळा कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना दिसून आल्या आहे. दरम्यान, गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती…
काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. जळगाव । जळगाव–पाळधी बायपासवर विचित्र अपघात घडला. काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली असताना भरधाव ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. दोन्ही बाजूने अपघात झाल्याने…
‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” जळगाव प्रतिनिधी । “माझ्या वडिलांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवशील का, असा प्रश्न विचारला आणि मी ‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” असे भावनिक प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे सन २०२० बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. मंदाकिनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत…
जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. जळगाव प्रतिनिधी । येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या सीए शाखेला पश्चिम भारत क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट शाखा म्हणून “प्रथम” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक व समाजाभिमुख उपक्रमांच्या जोरावर जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. मुंबई येथे मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ७६ व्या भव्य वार्षिक सोहळ्यात पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळ (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) यांच्या वतीने जळगाव सीए शाखेचा गौरव करण्यात…

