देशाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञ, वैज्ञानिक घडावेत : अशोक जैन जळगाव : समाजाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक, संशोधक, डॉक्टर, अभियंते आणि नवोन्मेषक घडवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांच्या मांध्यमातून भावी शास्त्रज्ञ, संशोधक घडत असतात, त्यामुळे अनुभूती स्कूलमध्ये असे उपक्रम आवर्जून राबविले जातात असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलच्या 14 व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमास अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, स्कूलचे सायन्स टिचर यू.व्ही. राव तसेच अनुभूती निवासी शाळेसह अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, काशिनाथ पलोड इंग्लिश मिडीयम स्कूल, एल. एच. पाटील…
Author: Nilesh Ajmera
जळगाव, धरणगाव-अमळनेरमार्गे विशेष गाडी धावणार जळगाव । राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथे दर्शनासाठी जाणाचा प्लॅन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार–काकीनाडा दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळसह जळगाव, धरणगाव आणि अमळनेर स्थानकावर या विशेष रेल्वे गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणाऱ्या जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी ही विशेष गाडी वरदान ठरणार असून, आगामी काळात अशाच आणखी सुविधांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गाडी क्रमांक ०७७०५ ही विशेष गाडी १८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत धावणार आहे. ही गाडी काकीनाडा येथून गुरुवारी सकाळी ५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी…
कार चालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी कट लागल्याच्या कारणावरून दुचाकी आणि कार चालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांवर दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी धाव घेत धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोघेही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक तुळशीराम बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी हे रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रात्री…
मेहरुण तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. सोशल मीडियावर मेहरुण तलावात सांडपाणी मिसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर दिपमाला मनोज काळे यांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याला तातडीने आळा घालण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेचे अभियंता आर. टी. पाटील यांना दिल्या. महापौरपदी निवड झाल्यानंतर सोमवारी दिपमाला काळे थेट रस्त्यांवर उतरल्या. सकाळी त्यांनी नेरी नाका स्मशानभूमी येथील विकासकामांचे लोकार्पण केले. त्यानंतर गो-शाळेत जाऊन गाईंना चारा खाऊ घालून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. दुपारी चार वाजता त्यांनी मेहरुण तलाव परिसरात जाऊन सांडपाणी समस्येची पाहणी केली. यावेळी अभियंता आर. टी. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की,…
भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे दमदार पाऊल !फडणवीसांकडून कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राने बळ दिले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षेत्रात क्रांती घडत आहे, ज्यामुळे पुढील वाटचालीस दिशा मिळेल. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. गेल्या वर्षी दावोस येथे महाराष्ट्राने सोळा लाख कोटी रुपयांचे करार केले होते, त्यापैकी पंचाहत्तर टक्के करार सक्रिय झाले आहेत आणि ते परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा करार श्री. भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्यासोबत केला होता, ज्याचे प्रत्यक्ष उद्घाटन आज करण्यात आले. टीका करणाऱ्यांना शब्दांनी नाही, तर…
जळगावकरांना उन्हाचा चटका; तापमान वाढीचा अंदाज जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी कडाक्याची थंडी आता कमी होऊ लागली आहे. तापमानात हळूहळू वाढ होत असल्याने दिवसा उन्हाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. रविवारी जळगावमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३२.५ अंशांपर्यंत पोहोचले. येत्या महाशिवरात्रीपर्यंत तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दिवसाचे तापमान ३२ अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिकांना सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे. दिवसा उन्हाची तीव्रता वाढत असून रात्री वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर थोडी थंडी जाणवते. हिवाळ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नसला तरी उन्हाळ्याची चाहूल लवकर लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीच्या…
खोकल्याचा त्रास : रुबी रुग्णालयात उपचार सुरु पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रँट यांना तसे कळविण्यात आले आहे. डॉक्टर परवेझ ग्रँट तपासणीनंतर शरद पवारांना एडमिट करायचे की…
महिलांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अज्ञात व्यक्तींनी एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील महिलांनी वेळीच सावधगिरी बाळगून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील राऊळ गल्लीमध्ये राहणारे आणि मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या घरात त्यांची आई नंदकोर राऊळ आणि बहीण किरण राऊळ रात्री झोपलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे २.३० वाजता घराबाहेर हालचाल झाल्याचा आवाज आणि पेट्रोलचा तीव्र वास येऊ लागला. काही क्षणांतच घराच्या दरवाजाजवळ आग लागल्याचे दिसून आले. धुराचा…
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली जळगाव – मैत्रीणीसोबत शिरसोली रस्त्यावरील कुरुक्षेत्र टर्फ परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आदित्य विलास चेके (वय २२, रा. श्रीधरनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित शेख रोशन शेख उस्मान (रा. तांबापुरा) याने आदित्य व त्याच्या मैत्रीणीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आदित्य चेके यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव…
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दीड तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. जळगाव – मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या आशुतोष दिलीप जोशी (वय २२, रा. गणेश नगर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मासेमारी करणाऱ्यांसह पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दीड तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेला आशुतोष जोशी याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून तो मंदिर, संस्थांच्यावतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमावेळी भजन, कीर्तन सादरीकरण करुन उदनिर्वाह करीत होता. रविवारी सकाळी तो घराजवळील सागर जयराम कटारिया (वय २२), सोमय्या राजेश…

