Author: Nilesh Ajmera

पिंप्राळ्यातील मारहाण प्रकरणाला गंभीर वळण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ! जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा प्रशांत पाटील चौक परिसरातून सार्वजनिक रस्त्याने जात असताना काही युवकांनी त्याला अडवले. कोणतेही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील उर्फ बॉण्ड आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमवर लाथाबुक्क्यांनी…

Read More

विवरा नजिक अवैध वाळूचे ट्रॅक्टर जप्त; रावेर तालुक्यातील विवरा नजिक अवैध वाळू वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर ट्रॉली महसूल विभागाने जप्त केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.रावेर तालुक्यात अवैध वाळू सैराट सुटले असून अपेक्षित कारवाया होत नसल्याने नाराजी आहे.आता याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे सरांनीच लक्ष देण्याची मागणी होत आहे. रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज बाबत तहसिलदार संजय तायडे यांच्या तासाई नंतर महसूल प्रशासन शुद्धीवर आले.एका पाठोपाठ एक अश्या दोन दिवसात दोन कारवाया झाल्या आहे. कारवाई बाबत ढिलाई बघता तहसीलदार संजय तायडे यांनी महसूल पथकाला फिल्डवर कारवाई करा ढिलाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश महसूल पथकाला दिला आहे. आज…

Read More

४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहें यावल : यावल तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून शासनाकडून प्रशाषक नेमवणूक करण्यात येत असून सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका सरपंच परिषद (मुंबई) यांच्या मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती यावल व जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे करण्यात आली. यावल तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्याचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद (मुंबई) शाखा यावल याच्या वतीने सरपंच परिषदचे यावल तालुका अध्यक्ष संदिप प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्यांची बैठक…

Read More

बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे आरटीओची फसवणूक; गुन्हा दाखल ! जळगाव प्रतिनिधी – आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ मालकाच्या जागी चक्क एक ‘डमी’ व्यक्ती उभी करून शासनाची आणि प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील नवनाथ नगर येथील रहिवासी दीपक शिवाजीराव ठाकरे (वय ४६) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ठाकरे यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक MH 19 EJ 8055) जळगाव आरटीओ कार्यालयात हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत हा मोठा गैरप्रकार झाला. संशयित आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध…

Read More

यावल येथे सेवाभावी संस्थेतर्फे जय्यत तयारी. यावल प्रतिनिधी : येथील श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दि. ८ रोजी सकाळी ६ वाजता श्री च्या मूर्तीचा अभिषेक व आरती, ७ वाजता लघु श्री विष्णू याग, ८ वाजता यावल शहरातील श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री गजानन महाराजांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक विरारनगर मधील श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत काढली जाईल. दुपारी १२ वाजता श्री विष्णू यागाची पूर्णाहुती व महाआरती,नंतर १२ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप,दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री तारकेश्वर महादेव भजनी मंडळ यावल यांचा…

Read More

केळी पीक विमा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि मध्यस्थींची कमाई. यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यात शेतकऱ्यांना केळी पिक विमा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी दलालांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याची आणि आर्थिक लूट सुरू असल्याची तालुक्यात चर्चा आहे.शासनाने जाहीर केलेल्या केळी पिक विमा योजनेअंतर्गत यावर्षी जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यातून जवळ जवळ १ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अशाप्रकारे विमा काढला गेल्याने काही ठिकाणी बोगस विमे काढताना ठीक ठिकाणच्या काही मध्यस्थी,दलालांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात म्हणजे अनेक शेतकऱ्याकडून प्रति हेक्टरी १ एक हजार रुपये घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे आणि अजून काही मध्यस्थी दलाल शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करीत आहे.गेल्या…

Read More

श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन या निमित्ताने घडले. जळगाव प्रतिनिधी । संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था, मेहरून यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जळगाव शहरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन या निमित्ताने घडले. पालखी सोहळ्याची सुरुवात मेहरून येथील साईबाबा मंदिरातून करण्यात आली. प्रारंभी श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीगीतांच्या निनादात पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली. मेहरून परिसरातील विविध भागांतून, विश्वकर्मा नगर आणि रामेश्वर कॉलनी मार्गे ही पालखी गणपती…

Read More

प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात २९ जानेवारी रोजी पहाटे पत्नी व तिच्या प्रियकराने अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सुनील श्रावण भोई (३४, रा रुबजीनगर, अमळनेर) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. सुनीलची पत्नी दीपाली भोई (३०) व तिचा प्रियकर अजय छोटू भोई (३२) आणि त्याची आई सुरेखा छोटू भोई, अशी गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही जणांची नावे आहेत.आत्महत्येच्या…

Read More

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ; जळगाव | देशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली आहे. पालकांनी ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केल्यानंतर तिघींनीही इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) या तीन बहिणींना कोरोना लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन गेमिंगचे तीव्र व्यसन जडले होते. त्या एका कोरियन ‘टास्क-बेस्ड’ ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. या व्यसनामुळे त्या नियमित शाळेतही जात नव्हत्या. तिन्ही बहिणी एकमेकींवर अतिशय प्रेम करत होत्या. जेवण,…

Read More

रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव |शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबत फिरायला चल असे सांगून  सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल राठोड (वय २५) याने अत्याचार केला. हा प्रकार दि. ३० जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड याने फिरायला जायच्या बहाण्याने दि. २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. त्याठिकाणी दि. ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितले…

Read More