घंटागाडी न आल्याने चौकाचौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरासह नवीन जोशी कॉलनी आणि सम्राट कॉलनी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी न आल्याने चौकाचौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून, पुन्हा एकदा महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या वतीने नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात येत नसल्याने घरगुती कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागांमध्ये आणि चौकांमध्ये साचून राहिला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, माशा, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी…
Author: Nilesh Ajmera
शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार आहे. जळगाव – “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना” हे ब्रीदवाक्य घेऊन, तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि उद्योजक घडवण्यासाठी पाळधी येथे एका भव्य ‘मोफत उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जीपीएस (GPS) मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित हा मेळावा गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.जीपीएस मित्र परिवार नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना आणि अनुदानाची…
बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी नुकताच पार पडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले असले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. त्यावर कोणत्या नेत्याची नियुक्ती करायची याबाबत राष्ट्रवादीमध्ये खल सुरू आहे. अगोदर या पदावर प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचे सांगितले जात होते. परंतु याबाबतचा दावा पटेल यांनी थेट फेटाळून लावत अजून कोणाचीही या पदासाठी निवड करण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी…
झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून रस्ता अतिक्रमणमुक्त करा! जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात प्रवेश करण्याचा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जाणारा जळगाव-आसोदा रस्ता गेल्या सुमारे तीस वर्षांपासून झोपडपट्टीच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाला असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी शंभर फूट रुंदी असलेला हा जिल्हा मार्ग आज अवघ्या 20 ते 25 फूटांवर आला असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून असोदा, भादली, शेळगाव, कडगाव, कानसवाडे, भुसावळ, यावल यासह अनेक गावांकडे जाणारी वाहतूक होते. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक, शेळगाव बॅरेज यांसारख्या पर्यटन व धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी हाच प्रमुख रस्ता आहे. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे पूर्वी…
हा आदेश शासकीय कार्यक्रम,अंत्ययात्रा, लग्न व धार्मिक मिरवणुकांना तसेच कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. जळगाव : जिल्ह्यातील आगामी राजकीय हालचाली व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका प्रलंबित आहे. तरी त्या अनुषंगाने जळगाव जिल्हयात ग्रामीण स्तरावर राजकीय हालचालीना वेग आला असून पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअनुषंगाने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक…
कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत भावपूर्ण अभिवादन केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत भावपूर्ण अभिवादन केले. कार्यकर्ते व नागरिकांसाठी दुपारपर्यंत अस्थिकलश राष्ट्रवादी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिकलश दर्शनावेळी उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भावूक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांना अश्रू अनावर झाले.
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ; संभाजीनगरहून उड्डाणापूर्वीच धोका टळला छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी । भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या संदर्भात आज एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून उड्डाण घेण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्याने संभाव्य धोका टळला आहे. सुदैवाने हा बिघाड टेकऑफपूर्वीच पायलटच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची तपासणी करत असताना पायलटला तांत्रिक बिघाड आढळून आला. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले आणि पंकजा मुंडेंनी आपला नियोजित प्रवास तसेच सभांच्या…
जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. याच बैठकीत चालू आर्थिक वर्षातील ८३४ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील,…
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; जळगाव शहरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य घरफोडी टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे कुटुंबासह गावी धानवड येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घरफोडी केली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता लाकडी कपाट फोडलेले व त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक…
धरणगावात बेकायदेशीर वास्तव्यास असलेली इराणी महिलेची होणार हकालपट्टी धरणगाव येथे गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या इराणी महिला फरनाज हमीद रेझा (वय ३८) आणि तिच्या मुलाची भारतातून इराण येथे हकालपट्टी केली जाणार आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथून दिल्लीला रेल्वेने, तर दि. ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला त्यांना रवाना करण्यात येणार आहे. यासाठी दोघांची विमान तिकिटेही काढण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात सदर इराणी महिला आपल्या मुलासह गेल्या एक वर्षापासून वास्तव्यास होती. याबाबतची माहिती धरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कुरेशी मोहल्ल्यातील एका घरातून महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणात त्या महिलेला बेकायदेशीर आश्रय देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

