फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तथा ‘APTI-MS तर्फे डॉ. व्ही. आर. पाटील यांना ‘बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’ फैजपूर प्रतिनिधी : फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन तथा ‘APTI-MS तर्फे डॉ. व्ही. आर. पाटील यांना ‘बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड’असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित “महा-APTICON २०२६” ही राज्यस्तरीय परिषद सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राज्यभरातील फार्मसी शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत फार्मसी शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन पद्धती, संशोधन आणि नवतंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या…
Author: Nilesh Ajmera
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने प्रेरणादायी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुसावळ प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूल येथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने प्रेरणादायी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील थोर महिलांच्या जीवनकार्यावर आधारित नाटिकांचे सादरीकरण करून स्त्री शक्तीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अंतराळवीर कल्पना चावला , सवित्रीबाई फुले .यांसारख्या महान महिलांची वेषभूषा करून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. स्वातंत्र्यलढा, संस्कार आणि आधुनिक काळातील कर्तृत्व या विविध अंगांनी महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नाटिकांमधून प्रभावी संदेश…
भुसावळ येथुन जवळ असलेल्या अकलूद शिवारात मंगळवार पासून कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर परिसरातून तापी नदीपर्यंत आणि तेथून कथास्थळापर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भुसावळ मार्गे रावेरहून मध्यप्रदेशकडे आणि भुसावळहून यावलमार्गे गुजरातकडे जाणारी तसेच येणारी सर्व अवजड वाहतूक पुढील सात दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. कथास्थळी भव्य व्यवस्थाआयोजन समितीने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कथास्थळी १३२ बाय ६०० फूट आकाराचा एक तसेच १०० बाय ६००…
‘भरोसा सेल’च्या इमारतीचे भूमिपूजन महिला व बालकल्याणार्थ मोठे पाऊल जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तत्पर तक्रार निवारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दिनांक ०८ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाला.सदर इमारतीचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी या केंद्राच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी…
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विरोधक आक्रमक : निषेधार्ह घोषणा महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन केले. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा, ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने दोन लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, विरोधकांनी या घोषणेवर टीका करत, ही कर्जमाफी अपुरी असल्याचे म्हटले आहे. सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हातामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, निकषांचा खेळ सोडा असे बॅनर घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. विरोधकांचा आक्षेप आहे की, सरकारने अटी व शर्ती लावून…
उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. पिंपळगाव हरे : उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. दरम्यान अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी स्वयंपाक बनवत असतानांना एलपीजी गॅस सिलेंडरची नळी लिक होऊन अचानक पेट घेणार तेवढ्यात अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगत आपल्या जीवाची परवा न करता पेट घेणाऱ्या गॅस गळतीला विझवून शाळेतील 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. या त्यांच्या हिमतीची दखल घेत कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी विजयकुमार ठाकुरवाड, कासोदा पोलीस स्टेशन एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्या…
शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले. यावल प्रतिनिधी : शहरातील व परिसरातील मोकाट फिरणारे गुरे आणि सांड यांचा बंदोबस्त ८ दिवसात न झाल्यास शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे, मोकाट गुरांमध्ये सांड सुद्धा आहेत रस्त्याने बैलगाडी,मोटरसायकलने जाणाऱ्या- येणाऱ्यांच्या अंगावर हे सांड मागे सुटतात व बैलगाडीला बांधलेल्या बैलांना मारतात जखमी करतात सदरचे सांड हे बैलगाडीला धडक देऊन माणसांना सुद्धा जखमी करून आजूबाजूने येणाऱ्या…
जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला. जळगांव प्रतिनिधी : खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघचे राज्याध्यक्ष श्री राजेंद्र निकम, महासचिव श्री विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगर सचिव श्री शेखर उंडे, सदस्य श्री अमोल शिंदे, नाशिक टिडीएफ संघटक श्री दिनेश देवरे, राज्य कार्यकारणी सदस्य श्री हेमंत कुमार पाटील,श्री देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री अजित चौधरी, जिल्हा सचिव श्री जीवन महाजन जिल्हाकार्याध्यक्ष श्री राकेश पाटील उपस्थित होते. संस्थेचे सभासद पाल्य यांनी नेत्र दीपक यश मिळवले त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.…
वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भुसावळ प्रतिनिधी : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना, “माझे माहेर तळवेल असले तरी माझे संपूर्ण शिक्षण तळवेल गावात झाले. त्या शिक्षणाच्या बळावरच मी वरणगाव शहरात समाजकार्य आणि राजकारणात सक्रिय झाले,” असे त्यांनी सांगितले. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महसूल उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे ,विभागाच्या मंडळ अधिकारी रंजना तायडे ,तलाठी रेणूका पाटील, तळवेल सरपंच विद्या ताई भारसके, अम्रपाली गवई, नगरसेविका…
तहसील कार्यालयासमोर आणून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मुक्ताईनगर प्रतिनिधी : नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवैध उत्खनन करतअसलेले चार डंपर व एक मोठे पोकलेन पकडून ते मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आणून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र तहसीलदार गिरीश वखरे यांनी सदरील वाहनांची चौकशी न करता, मुरूम उत्खननाचे परमीट न तपासता सुट्टीच्या दिवशी शनिवारी सोडून देण्याचे आदेश दिले, ज्यामुळे संबंधित कंत्राटदार बीएन अग्रवाल कंपनीने त्यांचे चार डंपर वर पोकलेन घेऊन निघून गेल्याचा आरोप संबंधित डंपर पकडून आणणाऱ्या नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहराततील सुज्ञ नागरिकांनी महसूल प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला असून कंत्राटदारावर प्रशासन मेहेरबान आहे का ? असा प्रश्न आता नागरिक…

