शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. जळगाव । शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. तक्रारीची दखल घेत शनिवारीच अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले. जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बळीराम मंदिर आणि शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाडी लावून किंवा रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेत्यांमुळे जवळपास ७० टक्के रस्ता ब्लॉक होतो आणि वाहनचालकांना ये-जा करण्यास रस्ता राहत नाही. शनिवारी तर कहरच असतो, काही मुजोर…
Author: Nilesh Ajmera
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जळगाव । गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. १ मार्च २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. तथापि, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची (१४ किलो) किंमत अद्यापही बदललेली नाही. संपूर्ण देशभरात कमर्शियल एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या आहेत. या किंमतीत २८ रुपयांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर १७६८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी हा दर १७४०.५० रुपये होता. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान व्यवासायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान,…
बसस्थानकातच महिलांनी दिला बेदम चोप पारोळा : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू झाली असून प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून याचा फायदा काही भुरटे चोर घेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रमाणे पारोळा येथील बसस्थानकात मंगलपोत चोरणाऱ्या एका महिलेस महिलांनी रंगेहात पकडल्यानंतर तिला बेदम चोप दिला. परंतु वेळेतच पोलीस दाखल झाल्याने महिला बचावली. सध्या लग्नसराई सुरू असून दि २५ रोजी लग्नाची मोठी तारीख असल्याने पारोळा शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानिमित्ताने दोन ते तीन महिला चोरट्या महिला बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. अनेक गाड्या भटकल्यानंतर त्यांनी फलाट क्रमांक सातवर उभी असलेली पारोळा-चाळीसगाव बसमध्ये प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहून गर्दीत ललिता…
चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या शिंदाड ता. पाचोरा : चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिंदाड येथील अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२) हा युवक पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या प्राणा बँकवेट हॉटेलमध्ये नोकरी करत होता. तो मागील काही महिन्यांपासून तेथे कामावर होता. दरम्यान, हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येऊन गुन्हा काबुल करण्यास हॉटेल संचालकांनी…
एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. मात्र याच आवडीचा फायदा घेऊन एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रामकांडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. करण (बदलेलं नाव ) आणि सिमरन (बदलेलं नाव ) हे दोघेही गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. करणने सिमरनला लग्न करण्याचं आमिष देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्यांना एक मूल…
वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई : ९० हून अधिक वाहनाविरुद्ध गुन्हे दाखल ! जळगाव प्रतिनिधी – आ एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वाळू वाहतूक प्रश्न उपस्थित केला असता जळगाव पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७/०२/२०२६ रोजी पहाटे ०५.०० वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी ही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.जळगाव उपविभागांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली आहे . या मोहिमेत जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाहीचे नेतृत्व केले…
शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक. यावल प्रतिनिधी : यावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी मोठा अपघात घडला.या अपघातात इको वाहन चालकासह सुमारे १० ते १२ लहान बालके तथा शालेय विद्यार्थी जखमी झाले तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाहतूक बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एस.टी बसचे वाहक एस.एम.पाटील व चालक ए.ए.तडवी हे होते. घटनेनंतर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात आणि संबंधित पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि सर्वांनी यावल ग्रामीण रुग्णालयात लहान लहान बालकांना पाहण्यासाठी गर्दी केली सकाळी साडेसातच्या…
सव्वा कोटीचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर. यावल प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच २७४ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प लोकनियुक्त नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांच्या आणि यावल नगरपरिषद नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.जनतेचे हित लक्षात घेता कोणत्याही प्रकारचे कर वाढ नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.शनिवारी दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोट्यावधी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असुन या अर्थसंकल्पात कोट्यावधीच्या विविध विकास कामांचा समावेश आहे.तर हा अर्थसंकल्प तब्बल एक कोटी २९ लाख ५९ हजार ४१० रुपयाचा शिलकी असून या अर्थसंकल्पात प्रपत्र ६ जोडून सदर निधी कोणत्या कामात किती प्रमाणात खर्च होईल याची माहिती देखील सभागृहात…
नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीशी किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले आणि त्यातून संतापाच्या भरात आरोपीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र…
जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव । आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जळगावकरांना आता दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघातर्फे येत्या १ मार्चपासून गोल्ड दूधाच्या एक लिटर व पाच लिटर पाऊचच्या दरात प्रति लिटर १ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्च २०२६ पासून हे नवीन दर लागू होणार असून, मात्र अर्धा लिटरच्या पाऊचला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे. संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाच्या दरात प्रति लिटर तब्बल सात रुपयांची वाढ…

