जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे आता प्रांतमंत्री जळगाव । प्रा. डॉ. सुरेश मुंढे व डॉ. वरुणराज नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी २३ जानेवारीला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात जबाबदारी स्वीकारतील. प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, येथे हिंदी…
Author: Nilesh Ajmera
जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे आता प्रांतमंत्री जळगाव । प्रा. डॉ. सुरेश मुंढे व डॉ. वरुणराज नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी २३ जानेवारीला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात जबाबदारी स्वीकारतील. प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, येथे हिंदी विषयाचे…
प्रजासत्ताक दिनी ,२,५०० कलाकारांचे सादरीकरण जळगाव । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन जयघोषांनी दुमदुमणार आहे. परेडची संकल्पना ‘वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र’, , ‘वंदे मातरम, समृद्धीचा मंत्र’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अशी आहे. ३० सजीव देखावे असंतील, त्यापैकी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील, तर १३ विविध मंत्रालये आणि विभागांचे असतील. याव्यतिरिक्त, अंदाजे २,५०० कलाकार सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. यावर्षी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-युरोप संबंधांना चालना मिळेल. गेल्या वर्षी परेडमध्ये सहभागी होऊ न शकलेली अनेक राज्ये यावेळी त्यांचा सांस्कृतिक वारसा दाखवतील. यामध्ये आसाम,…
थर्टी फस्टसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? जळगावमार्गे उद्या धावणार स्पेशल ट्रेन जळगाव । थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने या वर्षी थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता बिलासपूर-मडगाव व बिलासपूर-वलसाड या मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली. या गाडीला जळगावला देखील थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. बिलासपूर-मडगाव (०८२४१) दर शनिवारी दु. २.४५ वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी ६.५८ वाजता जळगावात येईल. सोमवारी पहाटे ही गाडी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-बिलासपूर (०८२४२) दर सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि मध्यरात्री १२.४० वाजता जळगाव स्थानकावर येईल. स्लीपर क्लाससाठी ७०० रुपये…
डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजिवन; जळगाव । जीवनातील दुःखद प्रसंग, मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. हा उपचारात्मक प्रवास केवळ वैद्यकीय यशाचाच नाही, तर समाजातील मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे. याबाबत माहिती अशी की, रुग्णाच्या वडिलांचे सुमारे दहा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. या धक्क्याने मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या रुग्णामध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागली. त्यातच त्याला मद्यपानाची सवय लागली आणि काही महिन्यांतच हे व्यसन गंभीर स्वरूप धारण करू लागले. या मानसिक तणावाखाली त्याने दोन वेळा आत्महत्येचा…
नगराध्यक्ष झालेले सुनील काळे काय निर्णय घेतात वरणगाव नगरपालिकाचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून त्यामुळे नगराध्यक्ष झालेले काळे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत सुनील काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत अपक्ष लढून त्यांनी विजय मिळविल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, भाजपात बंडखोरी केल्यानंतर निवडून आलेले सुनील काळे कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा आहेत. अशातच पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील काळे हे भाजपचेच आहेत आणि भाजपचेच राहतील, असे जाहीरपणे सांगितले होते. असे…
मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रूमची अधिकाऱ्यांकडून पाहणी जळगाव : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम व प्रशिक्षण हॉलची पाहणी केली. यावेळी मतमोजणीचे टेबल कसे लावले जातील, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मतमोजणी अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था कशी असेल याची माहिती शहर अभियंता यांनी यावेळी दिली. महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम सिलींग, सेटींगपासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व व्यवस्था कशी असेल, याची पाहणी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरीक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता योगेश बोरोले, आर. टी. पाटील, निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, महेश चौधरी, निवृत्ती गायकवाड, श्रीमती घाटगे यांनी शुक्रवारी दुपारी केली. महापालिकेची मतमोजणी एमआयडीसीमधी वखार मंडळाच्या गोडावून मध्ये…
गिरडमध्ये ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे भडगाव प्रतिनिधी : तालुक्यातील गिरड शिवारात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, मंगळवारी सकाळी ऊस तोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी आणि मजूर वर्गात प्रचंड भीती पसरली असून, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या गट क्रमांक १४९ मधील ४ एकर क्षेत्रात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी मजूर कामात व्यस्त असताना अचाकन पिल्लूचे आवाज येत अंसताना सोनु सुरेश नाईक व संजय भिवसन नाईक यांना बिबट्याचे पिल्लु…
जळगाव पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पोलिस दलातील पाच सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. या बदल्यांमुळे वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांची नशिराबाद पोलिस स्टेशनला प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निंभोरा पोलिस स्टेशनला सहायक पोलिस निरीक्षक बोचरे यांच्या जागी रावेर पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक…
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र; जागावाटपाचा फार्म्युला ठरला जळगाव प्रतिनिधी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीने ‘मिशन मनपा’साठी अखेर एकत्रित रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चांनंतर जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून, जागावाटपाचा ४६-२२-७ असा फार्म्युला ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात काल भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सखोल चर्चा होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. या…

